
'देवमाणूस' मालिकेतील 'हे' लोकप्रिय पात्र घेणार प्रेक्षकांचा निरोप
सध्या छोट्या पडद्यावरील 'देवमाणूस' Devmanus या मालिकेची फार चर्चा आहे. अल्पावधीतच लोकप्रिय झालेल्या या मालिकेतील प्रत्येक कलाकाराने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. टोण्या, आजी, दिव्या सिंग, डिंपल ही मालिकेतील काही पात्रं प्रेक्षकांना आवडू लागली आहेत. मात्र या मालिकेतील एक कलाकार लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचं समजतंय. ही मालिका आता अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. मालिकेच्या उत्तरार्धात पदार्पण करणारी अभिनेत्री नेहा खान Neha Khan ही मालिका सोडणार असल्याचं कळतंय. नेहा खानने मालिकेत एसीपी दिव्या सिंगची भूमिका साकारली आहे. (this character from the marathi serial devmanus to mark exit soon)
मालिकेत दिव्याला अखेर डॉ. अजितकुमारला जाळ्यात अडकविण्यात यश मिळालं आहे. मात्र जसजसं कथानक पुढे सरकत जाणार, तसतसे मालिकेतील पात्रांमध्ये बदल होत जाणार. म्हणूनच दिव्याचे पात्र पुढील काही भागांत संपणार असल्याचं समजतंय. मात्र दिव्याने प्रेक्षकांचा निरोप घेतल्यानंतर एका नव्या पात्राची एंट्री या मालिकेत होणार आहे. दिव्याच्या जागी आता एक पुरुष इन्स्पेक्टर मालिकेत येणार असल्याचं म्हटलं जात आहे.
हेही वाचा: अचानक बंद करण्यात आल्या 'या' मराठी मालिका
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' या मालिकेतून अभिनेता किरण गायकवाड घराघरात पोहोचला. किरणची भूमिका जरी नकारात्मक असली तरी या मालिकेमुळे त्याला चांगली प्रसिद्धी मिळाली आहे. मालिकेत देवमाणसाच्या चेहऱ्यामागे सीरिअल किलर असलेला डॉ. अजितकुमार खऱ्या आयुष्यात कसा आहे, हे जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांना आहे. सोशल मीडियावरही त्याचा फॅन फॉलोइंग दिवसेंदिवस वाढत आहे.
हेही वाचा: 'चांगला हेतू असलेला एक तरी पक्ष मला दाखवा', सुमित राघवन भडकला
Web Title: This Character From The Marathi Serial Devmanus To Mark Exit
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..