esakal | 'माझ्यासाठी ही फार कठीण वेळ'; आईच्या प्रकृतीविषयी अक्षय कुमारची पोस्ट
sakal

बोलून बातमी शोधा

akshay kumar with mother

'माझ्यासाठी ही फार कठीण वेळ'; आईच्या प्रकृतीविषयी अक्षय कुमारची पोस्ट

sakal_logo
By
स्वाती वेमूल

अभिनेता अक्षय कुमारची Akshay Kumar आई अरुणा भाटिया Aruna Bhatia यांना मुंबईतील हिरानंदानी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. आईची प्रकृती ठीक नसल्याने अक्षय कुमार सोमवारी पहाटे युकेहून मुंबईला परतला आहे. आईच्या प्रकृतीविषयी त्याने सोशल मीडियावर नुकतीच एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टद्वारे त्याने चाहत्यांनी केलेल्या प्रार्थनांसाठी त्यांचे आभार मानले आहेत. त्यासोबतच त्याच्यासाठी आणि त्याच्या कुटुंबीयांसाठी ही वेळ फार कठीण असल्याचं त्याने म्हटलंय.

अक्षय कुमारची पोस्ट-

माझ्या आईच्या प्रकृतीविषयी तुम्ही ज्याप्रकारे काळजी व्यक्त केली, त्यासाठी माझ्याकडे पुरेसे शब्द नाहीत. माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी ही फार कठीण वेळ आहे. तुमच्या प्रार्थनांची फार गरज आहे, असं अक्षयने या पोस्टमध्ये लिहिलंय.

हेही वाचा: अभिनेत्री आसावरी जोशीचा अपघात? जाणून घ्या सत्य..

आईची तब्येत बरी नसल्याने अक्षयने तातडीने युकेहून परतण्याचा निर्णय घेतला. आगामी 'सिंड्रेला' या चित्रपटाच्या शूटिंगसाठी युकेला गेला होता. सोमवारी पहाटे तो मुंबईला परतला आहे. चित्रपटाचं शूटिंग अर्ध्यावर सोडल्यानंतर अक्षयने निर्मात्यांना त्याची आवश्यकता नसलेल्या दृश्यांसाठी शूटिंग चालू ठेवण्यास सांगितलं आहे. खासगी समस्या असल्या तरी कामावर परिणाम होऊ नये याची काळजी त्याने घेतली आहे.

अरुणा भाटिया या ७७ वर्षांच्या आहेत. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या गुडघ्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. अरुणा या निर्माती असून त्यांनी बॉलिवूडच्या काही चित्रपटांची निर्मिती केली आहे. यामध्ये 'हॉलिडे', 'रुस्तम' या चित्रपटांचा समावेश आहे.

loading image
go to top