Indian Police Force: अशी झाली सिद्धार्थची 'इंडियन पोलिस फोर्स'मध्ये एन्ट्री, रोहित शेट्टीचा खुलासा

रोहित शेट्टीच्या आगामी इंडियन पोलिस फोर्समध्ये सिद्धार्थची एन्ट्री कशी झाली याचा खुलासा झालाय
this is how siddharth malhotra entry in indian police force trailer rohit shetty
this is how siddharth malhotra entry in indian police force trailer rohit shettySAKAL

Indian Police Force Siddharth Malhotra News: सध्या रोहित शेट्टीच्या आगामी 'इंडियन पोलीस फोर्स' वेबसिरीजची सर्वांना उत्सुकता आहे. या सिरीजमध्ये सिद्धार्थ मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहे. याशिवाय विवेक ओबेरॉय, शिल्पा शेट्टी हे कलाकार सुद्धा झळकत आहेत.

सिद्धार्थची ही पहिलीच वेबसिरीज आहे. सिद्धार्थची इंडियन पोलीस फोर्समध्ये एन्ट्री कशी झाली याचा रंजक खुलासा रोहित शेट्टीने केलाय. वाचा सविस्तर.

this is how siddharth malhotra entry in indian police force trailer rohit shetty
Satyashodhak: महात्मा फुलेंच्या जीवनकार्यावर आधारीत 'सत्यशोधक' सिनेमा टॅक्स फ्री, मुख्यमंत्री शिंदेंची घोषणा

नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत, दिग्दर्शक रोहित शेट्टीने सिद्धार्थ मल्होत्राला इंडियन पोलीस फोर्समध्ये कसे आणले याचा किस्सा सांगितला.

रोहित म्हणाला, "सिड आणि मी एकत्र काहीतरी करण्याचा विचार करत होतो, आणि मग मी त्याला इंडियन पोलीस फोर्सची स्क्रिप्ट ऐकवली. आम्ही नक्कीच एका मोठ्या अॅक्शन फिल्मप्रमाणे या सिरीजला शूट करू असं त्याला सांगताच सिद्धार्थ लगेच तयार झाला. या सिरीजमधला तो सर्वात देखणा पोलिस आहे."

अॅक्शन हिरो सिद्धार्थ मल्होत्राने याआधी राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या 'शेरशाह' सिनेमात कॅप्टन विक्रम बत्राच्या भूमिकेने सर्वांची मनं जिंकली.

त्यानंतर मिशन मजनू या चित्रपटात सिद्धार्थने एका गुप्तहेराची भूमिका केली होती. आता, रोहित शेट्टीच्या कॉप युनिव्हर्समध्ये तो पोलिसाच्या भूमिकेत असल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.

सिद्धार्थकडे पोलिसांसाठी लागणारं तडफदार व्यक्तिमत्त्व तर आहेच. परंतु तो त्याच्या उत्कृष्ट ऑन-स्क्रीन अभिनयातून पोलिसांच्या भूमिकेत छाप पाडेल यात शंका नाही.

इंडियन पोलीस फोर्स वेब सिरीजच्या ट्रेलरला प्रचंड प्रेम मिळालं. ज्यामुळे सिद्धार्थ मल्होत्राच्या लार्जर-दॅन-लाइफ, भारतीय पोलिस दलातील अॅक्शन-पॅक कामगिरी पाहण्यासाठी सर्वांचा उत्साह वाढला आहे.

इंडियन पोलीस फोर्स ही सात भागांची सीरीज 19 जानेवारी 2024 रोजी अमेझॉन प्राईमवर प्रीमियर होणार आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com