देव आनंद काळा कोट का घालायचे नाहीत? कारण ऐकून व्हाल थक्क!

यामागे कोणतीही अंधश्रद्धा कारणीभूत नव्हती.
dev anand
dev anand

१९५० आणि १९६० च्या दशकात रुपेरी पडद्यावरील सुपरस्टार देव आनंद Dev Anand यांचा मोठा चाहतावर्ग होता. लाखो तरुणींच्या गळ्यातील ताईत बनलेल्या देवानंद यांची एक झलक पाहण्यासाठी चाहते आतूर असायचे. इंडस्ट्रीतील सर्वांत देखण्या अभिनेत्यांमध्ये देव आनंद यांचं नाव आजही घेतलं जातं. त्यांच्या सदाबहार अभिनयाने, स्टाइलने तरुणींना भुरळ घातली होती. मात्र या फॅन फॉलोइंगमुळे देव आनंद यांना काही अडचणींचाही सामना करावा लागला होता. याच अडचणींमुळे त्यांनी काळा कोट किंवा काळ्या रंगांचे कपडे परिधान करणं बंद केलं होतं. (this is why Dev Anand never wore a black coat in public)

१९५८ साली 'काला पानी' या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या वेळचा हा किस्सा आहे. यामध्ये देव आनंद यांच्यासह मधुबाला आणि नलिनी जयवंत यांच्या मुख्य भूमिका होत्या. या चित्रपटानंतर देव आनंद यांचा काळ्या कोटमधील लूक प्रचंड चर्चेत आला होता. त्यांना या लूकमध्ये पाहून मुली अक्षरश: वेड्यासारख्या वागायच्या, असं म्हटलं जातं. आपल्या आवडत्या अभिनेत्यासाठी तरुणी स्वत:चा जीवसुद्धा द्यायला तयार असायच्या. अखेर ही परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी आणि कोणाच्याही जीवाला धोका पोहोचू नये या उद्देशाने देव आनंद यांनी महत्त्वाचा निर्णय घेतला.

dev anand
Video : '३ वर्षे हाती काम नाही, डोक्यावर कर्जाचं ओझं'; 'जेके तळपदे'ची खास मुलाखत

तेव्हापासून देव आनंद यांनी काळ्या रंगाचे कपडे किंवा काळा कोट परिधान करणं बंद केलं. देव आनंद हे एकेकाळी बॉलिवूडमधील सर्वांत यशस्वी अभिनेते होते. १९७०च्या काळातही त्यांना चित्रपटांमध्ये मुख्य भूमिकेच्या ऑफर्स मिळत होत्या. तर त्यांचे सहकलाकार राज कपूर आणि दिलीप कपूर यांना ज्येष्ठ व्यक्तींच्या भूमिका मिळत होत्या.

dev anand
Video: "लवकर लग्न करून सेटल व्हायचंय"; जोडीदाराबद्दल तेजश्री प्रधान व्यक्त

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com