
'बिग बॉस मराठी'साठी अभिनेत्रीने सोडली 'देवमाणूस' मालिका?
झी मराठी वाहिनीवरील 'देवमाणूस' Devmanus ही मालिका फारच लोकप्रिय ठरली आहे. या मालिकेत येणारे रंजक वळण प्रेक्षकांना कथानकाशी खिळवून ठेवत आहे. या मालिकेत अभिनेता किरण गायकवाड Kiran Gaikwad मुख्य भूमिका साकारत आहे. किरण हा 'लागीरं झालं जी' या मालिकेतून घराघरात पोहोचला होता. मात्र आता डॉक्टर अजितकुमार देव या भूमिकेतून त्याने एक वेगळीच छाप सोडली आहे. ही मालिका आता अत्यंत रंजक वळणावर येऊन पोहोचली आहे. एसीपी दिव्या सिंगने प्रयत्न करून अजितकुमारविरोधात पुरावे गोळा केले आहेत. तिच्या प्रयत्नांना सरकारी वकील आर्या देशमुखची साथ मिळाली. या दोघी मिळून देवीसिंगचा खोटा चेहरा सर्वांसमोर आणणार का याची उत्सुकता निर्माण झाली आहे. मात्र त्याचसोबत या मालिकेतील लोकप्रिय चेहरा लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार असल्याचंही कळतंय. (this marathi actress to quit devmanus for bigg boss marathi show)
मालिकेत आता दिव्या सिंग दिसणार नाही, असं म्हटलं जातंय. कारण दिव्या सिंगच्या जागी एक नवीन पोलीस अधिकारी झळकणार असल्याचं कळतंय. यामध्ये आर्याची भूमिका अभिनेत्री सोनाली पाटील साकारत आहे. तर दिव्या सिंगची भूमिका नेहा खान साकारत आहे. नेहा लवकरच मालिका सोडणार असल्याचं समजतंय. त्यामुळे तिच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे देवी सिंगच्या पात्राचं काम संपलं अशी चर्चा आहे तर दुसरीकडे नेहाला दुसऱ्या कार्यक्रमाची ऑफर मिळाल्याची चर्चा आहे.
हेही वाचा: अचानक बंद करण्यात आल्या 'या' मराठी मालिका
हेही वाचा: इगतपुरी रेव्ह पार्टी: अटक झालेली 'मराठी बिग बॉस' फेम हिना पांचाळ कोण आहे?
महेश मांजरेकर सूत्रसंचालन करत असलेला 'बिग बॉस मराठी' या वादग्रस्त आणि सर्वांत लोकप्रिय रिअॅलिटी शोचा तिसरा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. या तिसऱ्या सिझनमध्ये सहभागी होण्यासाठी नेहा खान 'देवमाणूस' मालिका सोडत असल्याची चर्चा आहे. आता नेहा खान बिग बॉस मराठीमध्ये दिसणार का, याबद्दल तिच्या चाहत्यांची उत्सुकता वाढली असून येत्या काही दिवसांतच चित्र स्पष्ट होईल.
Web Title: This Marathi Actress To Quit Devmanus For Bigg Boss Marathi
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..