
कलर्स मराठी वाहिनीवरील 'सुंदरा मनामध्ये भरली' Sundara Manamadhye Bharali ही मालिका अल्पावधीतच लोकप्रिय झाली. अभिमन्यू आणि लतिका या दोघांमधील केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडू लागली. मालिकेत लतिकाची भूमिका अभिनेत्री अक्षया नाईक Akshaya Naik साकारत आहे तर अभिमन्यूच्या भूमिकेत अभिनेता समीर परांजपे Sameer Paranjape आहे. नुकतंच एका अभिनेत्रीने या मालिकेचा निरोप घेतल्याचं समजतंय. नंदिनीची भूमिका साकारणारी अभिनेत्री अदिती द्रविडने Aditi Dravid ही मालिका सोडल्याची चर्चा आहे. यामागचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालं नाही. मात्र आरोग्याच्या समस्येमुळे तिने मालिका सोडल्याचं म्हटलं जात आहे.
काही दिवसांपूर्वीच अदितीच्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर तिच्या वडिलांनी एक पोस्ट लिहिली होती. अदितीला डेंग्यू झाल्याचं तिच्या वडिलांनी या पोस्टमधून सांगितलं होतं. 'अदितीला डेंग्यूचं निदान झाल्याने तिचे सर्व सोशल मीडिया अकाऊंट्स आणि खासगी कॉन्टॅक्ट नंबर्स हे तिचे वडील विनायक द्रविड यांच्याकडून हाताळले जात आहेत', असं त्यांनी पोस्टद्वारे स्पष्ट केलं होतं. त्यांच्या या पोस्टवर अनेकांनी कमेंट्स करत अदितीला काळजी घेण्याचं आवाहन केलं होतं.
अदितीने याआधी 'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेत इशा निंबाळकरची भूमिका साकारली होती. या भूमिकेला प्रेक्षकांकडून खूप प्रेम मिळालं. या मालिकेदरम्यान रसिका सुनील आणि अदिती यांच्यात चांगली मैत्री झाली. सोशल मीडियावरही या दोघींच्या मैत्रीची चर्चा असायची.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.