Tiger 3 Released Date: अखेर सलमानच्या टायगर 3 ची रिलीज डेट समोर, पहिला हिंदी सिनेमा जो रविवारी प्रदर्शित होणार

सलमान खानच्या टायगर 3 ची रिलीज डेट समोर आलीय
tiger 3 released date revealed this diwali salman khan katrina kaif shah rukh khan
tiger 3 released date revealed this diwali salman khan katrina kaif shah rukh khan SAKAL

Tiger 3 Released Date: सलमान खानच्या टायगर 3 सिनेमाची सर्वांना उत्सुकता आहे. काही दिवसांपुर्वी टायगर का मॅसेज हा खास व्हिडीओ समोर आल्यानंतर टायगर 3 ने चांगलंच वातावरण तयार केलंय.

अशातच सलमान खानच्या टायगर 3 ची रिलीज डेट समोर आलीय. टायगर 3 ची रिलीज डेट समोर आलीय. टायगर 3 च्या निमित्ताने पहिल्यांदाच एक मराठी सिनेमा रविवारी रिलीज होणार आहे.

(tiger 3 released date revealed this diwali)

tiger 3 released date revealed this diwali salman khan katrina kaif shah rukh khan
Gadkari Movie: हा अभिनेता साकारणार नितीन गडकरींची भूमिका, नवीन पोस्टरमधून झाला खुलासा

टायगर 3 ची रिलीज डेट आली समोर

सलमान खानच्या टायगर 3 ची रिलीज डेट समोर आलीय. टायगर 3 दिवाळीत रिलीज होणार हे सर्वांना माहितच आहे. पण सिनेमाच्या रिलीज डेट बद्दल खुलासा झाला नव्हता.

अखेर पिंकवीलाने दिलेल्या वृत्तानुसार, टायगर 3 च्या रिलीजसाठी निर्मात्यांनी कंबर कसली आहे. टायगर 3 रविवार १२ नोव्हेंबरला रिलीज होणार आहे.

यशराज फिल्म्सचा टायगर 3 च्या रिलीजसाठी खास पॅटर्न

YRF टायगर 3 चित्रपटाच्या रिलीजसाठी एक अनोखा पॅटर्न स्वीकारण्याचा विचार करत आहे. 2023 हे हिंदू कॅलेंडरनुसार "आधिक मास" वर्ष म्हणून ओळखले जातेय. सोमवार, १३ नोव्हेंबरला हिंदू कॅलेंडरनुसार अमावस्या आहे. ही तारीख चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी ज्योतिषशास्त्राच्या दृष्टीने अनुकूल दिवस नाही

तर गुजराती नववर्ष प्रत्यक्षात १४ नोव्हेंबरला येते. याशिवाय भाऊबीज आहे १५ नोव्हेंबरला साजरी केली जातेय. त्यामुळे दिवाळीमधील सणांचा विचार करता टायगर 3 ची रिलीज डेट १२ नोव्हेंबर करण्यात आलीय.

भारत - पाकिस्तान मॅच दरम्यान येणार टायगर 3 चा ट्रेलर ?

येत्या १६ ऑक्टोबर रोजी टायगर ३ चा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला येण्याची शक्यता आहे. भारत आणि पाकिस्ताच्या मॅचच्या दरम्यान या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.

टायगर 3 मध्ये सलमान खान, कतरिना कैफ शिवाय इमरान हाश्मी खलनायकाच्या भूमिकेत झळकणार आहे. याशिवाय शाहरुख खान सिनेमात पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारणार आहे

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com