टायगरची पितृभक्ती 

वृत्तसंस्था
शनिवार, 18 फेब्रुवारी 2017

टायगर श्रॉफचा "मुन्ना माइकल' हा चित्रपट सध्या खास चर्चेत आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टीमने मुंबईतील तीनबत्ती भागात चित्रीकरण केलं. या भागात पूर्वी जॅकी श्रॉफ राहायचा. तसेच टायगरने "डिंग डांग' या गाण्यातून त्याचे वडील जॅकी श्रॉफला ट्रिब्युट दिल्याचीही चर्चा आहे. या गाण्याचं चित्रीकरणही नुकतंच करण्यात झालंय. या गाण्यासाठी टायगरने जॅकी श्रॉफच्या 90च्या दशकतील लूकसारखा वेश परिधान केलाय. हे गाणं फिल्म सिटीमधे बसच्या टपावर चित्रीत करण्यात आलं. गणेश आचार्यने या गाण्याची कोरिओग्राफी केलीय. टायगर या गाण्याबद्दल म्हणाला, "हे गाणं माझ्या बाबांसाठी ट्रिब्युट आहे.

टायगर श्रॉफचा "मुन्ना माइकल' हा चित्रपट सध्या खास चर्चेत आहे. नुकत्याच या चित्रपटाच्या टीमने मुंबईतील तीनबत्ती भागात चित्रीकरण केलं. या भागात पूर्वी जॅकी श्रॉफ राहायचा. तसेच टायगरने "डिंग डांग' या गाण्यातून त्याचे वडील जॅकी श्रॉफला ट्रिब्युट दिल्याचीही चर्चा आहे. या गाण्याचं चित्रीकरणही नुकतंच करण्यात झालंय. या गाण्यासाठी टायगरने जॅकी श्रॉफच्या 90च्या दशकतील लूकसारखा वेश परिधान केलाय. हे गाणं फिल्म सिटीमधे बसच्या टपावर चित्रीत करण्यात आलं. गणेश आचार्यने या गाण्याची कोरिओग्राफी केलीय. टायगर या गाण्याबद्दल म्हणाला, "हे गाणं माझ्या बाबांसाठी ट्रिब्युट आहे. मुन्नाच्या रूपात ट्रीब्युट देण्याची मला ही संधी मिळाली. माझे वडील हे माझे सगळ्यात आवडते अभिनेते आणि माझे मित्र आहेत. त्यांच्यामुळेच मी आहे. म्हणून माझ्या या भूमिकेतून मी त्यांना ट्रिब्युट देण्याचा प्रयत्न केलाय. तसंही टायगरची शिवभक्ती आणि पितृभक्ती सर्वज्ञात आहेच. 

Web Title: tiger shroff and jackie shroff