Tiger V/S Pathaan सिनेमाविषयी समोर आली मोठी अपडेट.. आता मेकर्स म्हणतायत..

यशराज प्रॉडक्शनला 'टायगर वर्सेस पठाण' सिनेमाला पूर्ण वेळ द्यायचा आहे म्हणूनच हा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.
Shahrukh Khan, Salman Khan
Shahrukh Khan, Salman Khan Esakal

Tiger V/S Pathaan: शाहरुख खान आणि सलमान खानचा 'पठाण' सिनेमा अजूनही चर्चेत आहे. कारण या सिनेमात 'पठाण' मध्ये सलमान खानच्या कॅमियोला लोकांचा चांगला प्रतिसाद मिळाला होता. त्यामुळे आता शाहरुख-सलमानचा अखंड एक सिनेमा भेटीस आला तर लोक वेडे होतील असं म्हटलं जातंय.

काही दिवसांपूर्वी सिनेमाच्या शूटिंग डेटपासून ते सिनेमातील व्हिलनच्या भूमिकेपर्यंत अनेक बातम्या सूत्रांनी दिलेल्या माहितीमधनं समोर आल्या होत्या आणि आता सिनेमाविषयी आणखी एक मोठी अपडेट समोर आली आहे.(Tiger V/S Pathaan yashraj film shahruk khan and salman khan movie updates)

Shahrukh Khan, Salman Khan
Shahid Kapoor: ट्वीटरवरची ब्लू टीक गेली अन् भडकला शाहिद.. कबीर सिंग अंदाजात मस्कला धमकी देत म्हणाला,'ए एलन..'

टाईम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार सलमान खान आणि शाहरुख खान यांच्या नव्या सिनेमाचं शूट सुरू करण्याचा विचार सध्या मेकर्स तरी करताना दिसत नाहीयत. गेल्या काही दिवसांपासून या सिनेमा संबंधित बऱ्याच उलट-सुलट बातम्या कानावर पडत आहेत. आणि आता यशराजच्या जवळच्या एका सूत्राला जेव्हा याविषयी विचारलं तेव्हा उत्तर मिळालं की,'हा सिनेमा खरंच बनतोय का?'

रिपोर्टनुसार,आतापर्यंत सिनेमासंबंधित अधिकृतरित्या घोषणा केली गेलेली नाही. यातली खरी गोष्ट हीच आहे की अद्याप सिनेमा फक्त एक आयडिया म्हणूनच आहे.

रिपोर्टनुसार,दोन्ही सुपरस्टार्स सोबतची बातचीत अद्याप सुरुवातीच्या स्टेजवर आहे. या सिनेमाची कोणतीही स्क्रिप्ट रेडी नाही आहे,ना या स्क्रिप्टविषयी कोणी विचार करत आहे. नोव्हेंबर २०२३ मध्ये 'टायगर ३' रिलीज होतोय. त्यानंतर यशराज आपला ब्लॉकबस्टर सिनेमा 'वॉर २' वर लक्ष केंद्रित करणार आहे.

याचं दिग्दर्शन अयान मुखर्जी करणार आहे. सूत्रानं तर थेट सांगितलं की,''मला वाटतं टायगर वर्सेस पठाणचं शूटिंग दूरच पण यावर विचार देखील अद्याप करायला कोणी घेतलेला नाही''.

Shahrukh Khan, Salman Khan
Tejaswini Pandit: 'तरीच म्हटलं आज गरम जरा जास्तच होतंय..'

'पठाण' मध्ये शाहरुख खान सोबत सलमान खानच्या एन्ट्रीनं हे क्लिअर केलंच होतं की 'टायगर ३' मध्ये शाहरुख-सलमान पुन्हा एकत्र दिसणार आहेत. कदाचित मेकर्सना देखील दोघांच्या जोडीला सारखं सारखं पडद्यावर आणून त्यातील मजा घालवायची नसेल. 'टायगर वर्सेस पठाण' आधी हे देखील पहावं लागेल की 'टायगर ३' मध्ये शाहरुखच्या कॅमियोला लोक कसा प्रतिसाद देतायत ते.

Shahrukh Khan, Salman Khan
Tollywood: सोशल मीडियावर नंबर शेअर करणं साऊथ अभिनेत्रीला पडलं महाग.. आता त्या नंबरवर नको-नको त्या गोष्टी पाठवतायत लोक

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com