Ali Dulin Died : टिकटॉक स्टारचा वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू; 'ही' पोस्ट ठरली अखेरची | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ali Dulin Died

Ali Dulin Died : टिकटॉक स्टारचा वयाच्या २१ व्या वर्षी मृत्यू; 'ही' पोस्ट ठरली अखेरची

टिकटॉक स्टार अली डुलिनचा कार अपघातात मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर ती अली स्पाइस या नावाने ओळखली जात होती. अवघ्या २१ व्या वर्षी निधन झाल्याने अनेक स्तरातून हळहळ व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा : इच्छापत्र करायचंय...मग या गोष्टी नक्कीच माहिती हव्यात....

हेही वाचा: 'टिकटॉक ' फेम सूरज चव्हाण झळकणार चित्रपटात | पाहा व्हिडिओ

एका भावनिक पोस्टमध्ये, डुलिनच्या मित्राने लिहिले आहे की, "माझा विश्वास बसत नाही की तू आता या जगात नाहीयेस. तुला कधीच विसरता येणार नाही. तु कायम माझ्या आयुष्यात राहशील

हेही वाचा: ट्विटरचे नवीन फीचर, टिकटॉक प्रमाणे करेल काम; जाणून घ्या सविस्तर

ही पोस्ट ठरली अखेरची

अली डुलिनने तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट 5 डिसेंबर रोजी शेअर केली होती. या पोस्टमध्ये ती ब्लॅक टॉप आणि रेड शॉर्टमध्ये पोज देताना दिसून आली होती. या पोस्टला तिने "प्रिटी बिच , प्रिटी हार्ट प्रिटी माइंड.." अशी कॅप्शन दिली होती.

कोण होती अली डुलिन

अली डुलिन ही सोशल मीडिया इंफ्लूएंशर होती. तिने हूटर्समध्येही काम केले होते. Tiktok वर तिचे 200K पेक्षा जास्त फॉलोअर्स होते. तिचे बहुतेक व्हिडिओ हूटर्स, डान्स व्हिडिओचे होते.

टॅग्स :accidentdeathTikTok