
ट्विटरचे नवीन फीचर, टिकटॉक प्रमाणे करेल काम; जाणून घ्या सविस्तर
ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसाठी सतत नवीन फीचर्स आणत असते, लवकरच ट्विटर आपल्या वापरकर्त्यांसाठी TikTok सारखे एक खास फीचर घेऊन येत आहे. मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटरने ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. या नवीन फीचरद्वारे कंपनी आपल्या यूजर्सना 'कोट ट्विट विथ रिअॅक्शन'ची (Quote Tweet With Reaction) सुविधा देणार आहे. या फीचरबद्दल जाणून घेऊया.
सध्या, वापरकर्त्यांना त्यांच्या कोटसह कोणाच्याही ट्विटला उत्तर देण्यासाठी Quote Tweet पर्यायावर क्लिक करावे लागत होते. पण आता त्याच कोट रिप्लायमध्ये तुम्ही तुमचा फोटो किंवा व्हिडिओसह रिप्लाय करू शकाल. ट्विटरने ट्विट करून या फीचरची माहिती दिली आहे. तुम्ही हे फीचर कसे वापरू शकता हे देखील सांगितले आहे.
कोट ट्विट विथ रिअॅक्शन' हे फिचर सध्या iOS बीटा व्हर्जनवर रिलीझ करण्यात आले आहे. म्हणजेच यावेळी iOS चे बीटा युजर्स या नवीन फीचरची चाचणी घेतील. त्यानंतर हे फीचर अँड्रॉइड युजर्ससह इतर सर्व युजर्ससाठीही सुरू होईल.
ट्विटरचे नवीन फीचर
ट्विटरचे हे नवीन फीचर टिकटॉकच्या फीचरसारखेच आहे, ज्यामध्ये युजर्स एखाद्याच्या व्हिडिओला स्वतःच्या फोटो किंवा व्हिडिओसह उत्तर देऊ शकतात. ट्विटरला देखील असे मजेदार फीचर लॉंच करून आपल्या वापरकर्त्यांना आपल्या प्लॅटफॉर्मशी कनेक्ट ठेवायचे आहे. आता ट्विटरचे हे नवीन फीचर युजर्सला कितपत आवडते हे पाहावे लागेल.
ट्विटरचे हे नवीन फीचर त्याच्या जुन्या फीचर फ्लीट्ससारखे आहे. फ्लीट्स फीचर इंस्टाग्राम स्टोरीज सारखेच असायचे, ज्यामध्ये वापरकर्ते त्यांच्या गॅलरीतून कोणताही फोटो किंवा व्हिडिओ ट्विट करू शकतात आणि ते इन्स्टाग्राम स्टोरीज प्रमाणे 24 तासांनंतर अदृश्य होत असे. दरम्यान ट्विटरने हे फीचर लाँच झाल्यानंतर केवळ 8 महिन्यांतच गेल्या वर्षी ऑगस्ट 2021 मध्ये बंद केले आहे. आता यावेळेस ट्विटर फ्लीट्स प्रमाणेच एक नवीन फीचर सादर करण्यात आले आहे आणि त्याला ट्विट टेक असे नाव देण्यात आले आहे.