Timespass 3 : प्रथमेश परबची 'ड्रीम गर्ल' कोण?, ऐका Exclusive मुलाखत

अभिनेता प्रथमेश परबने सांगितल्या काही मनातल्या गोष्टी..
timepass 3 fame prathmesh parab want to work with alia bhatt she is his dream girl
timepass 3 fame prathmesh parab want to work with alia bhatt she is his dream girlsakal

prathmesh parab : 'बालक-पालक' चित्रपटातून मराठी मनोरंजन विश्वात पदार्पण केलेला अभिनेता प्रथमेश परब सध्या यशाच्या शिखरावर आहे. "बालक-पालक" नंतर तो "टाईमपास" चित्रपटात झळकला आणि बघता बघता या चित्रपटाचे तीन भाग झाले. सध्या चर्चा आहेत ती "टाइमपास ३" ची. या चित्रपटातून त्याला मिळालेली "दगडू" ही ओळख न पुसण्यासारखी आहे. "हम गरीब हुए तो क्या हुआ दिल से अमीर है’ म्हणणारा प्रथमेश पुन्हा एकदा वेगळ्या अंदाजात समोर येणार आहे. त्याच्या या चित्रपटाच्या निमित्ताने त्याने सकाळ unplugged मध्ये त्याच्या आयुष्याचा प्रवास उलगडला. त्याचा स्ट्रगल, त्याची प्रगती आणि चित्रपटासोबत वैयक्तिक आयुष्यातबाबतही तो यावेळी भरभरून बोलला आहे.

(timepass 3 fame prathamesh parab want to work with alia bhatt she is his dream girl)

दगडू म्हणजे प्रथमेश परब याने अत्यंत स्ट्रगल करून इथवर मजल गाठली आहे. त्याच्या timepass मधल्या भूमिकेमुळे आजही त्याला लोक दगडू म्हणूनच ओळखतात. महाविद्यालयीन जीवनात एकांकिका, नाटक करत दगडू चित्रपटापर्यंत पोहोचला. 'बालक पालक' चित्रपटानंतर जवळपास दिड वर्षे त्याच्याकडे काम नव्हते. त्यावेळी त्याने नाटकाच्या बॅक स्टेज पासून सर्व पद्धतीचे कामे केली. त्यांनतर आलेल्या टाईमपासने त्याचे आयुष्य बदलेले. प्रथमेशने आजवर अनेक अभिनेत्रींसोबत काम केले आहे. पण त्याच्या मनातली ड्रीम गर्ल कोण आहे, याविषयी तो 'सकाळ'ला दिलेल्या मुलाखतीत बोलला आहे.

(timepass 3 cast) (timepas 3 release date)

प्रथमेश म्हणतो, सध्या माझी ड्रीम गर्ल अभिनेत्री आलीया भट आहे. तिच्या सारखी अभिनेत्री मी आजवर पाहिलेली नाही. प्रत्येक चित्रपटात नव्याने समोर येते. तिच्याविषयी मला खूप आदर आहे. आणि तिच्यासोबत काम करण्याची तीव्र इच्छा आहे. तशी संधी मिळाली तर मी कधीच सोडणार नाही.' असे त्याने आलिया विषयी सांगितले. याशिवाय त्याच्या स्ट्रगलविषयी, चाळीतले जीवन, बदलत गेलेली परिस्थिती, त्याच्यातील माणूसपण, अभिनेता म्हणून स्वतःला सिद्ध करण्यासाठी सुरु असलेली धडपड याविषयी देखील तो बोलला आहे. हे सर्व ऐकण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर नक्की क्लिक करा आणि प्रथमेश सोबतच्या मनमोकळ्या गप्पा सकाळ पॉडकास्ट (sakal unplugged with prathamesh parab) मध्ये एक.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com