Timepass 3 : 400 स्क्रिन्स Aआणि 10,000 शोजसह उद्या उडणार धुरळा

रवी जाधव दिग्दर्शित 'टाइमपास 3' हा चित्रपट प्रदर्शित होणार असून चाहते प्रतीक्षेत आहेत.
timepass 3 movie release tomorrow  29 july cast music hruta durgule prathamesh parab ravi jadhav
timepass 3 movie release tomorrow 29 july cast music hruta durgule prathamesh parab ravi jadhav sakal

timepass 3 : सध्या चर्चा आहे ती त्यांच्या 'टाइमपास 3' या चित्रपटाची. दगडूच्या आयुष्यातील पहिलं प्रेम आणि लग्नापर्यंतचा प्रवास त्यांनी दोन भागांमध्ये दाखवला, आता दरम्यानच्या काळात जेव्हा दगडूला प्राजक्ता जोडून गेली तेव्हा नेमकं काय झालं, याची भन्नाट स्टोरी म्हणजे हा 'टाइमपास 3' आहे. विशेष म्हणजे तरुणांची लाडकी अभिनेत्री हृता दुर्गुळे आणि प्रथमेष परब यांची जोडी पाहण्यासाठी चाहते भलतेच उत्सुक आहेत. कारण चित्रपटाकहा ट्रेलर आणि गाणी पाहून प्रेक्षकांना कधी एकदा चित्रपट प्रदर्शित होतोय असे झाले आहे. पण तो क्षण जवळ आला आहे. 'टाइमपास 3' हा चित्रपट उद्या 29 जुलै रोजी प्रदर्शित होणार आहे

(timepass 3 movie release tomorrow 29 july cast music hruta durgule prathamesh parab ravi jadhav)

चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर एक खास पोस्ट शेअर केली आहे. चित्रपटाचा एक पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं की, 'मराठीतल्या ब्लॉकबास्टरची मोठ्या पडद्यावर होणार जबराट एन्ट्री! 400 स्क्रिन्स आणि 10,000 शोजसह 'टाईमपास 3' 29 जुलैपासून येणार प्रेक्षकांच्या भेटीला. दगडूचा लवचा लोचा पाहण्यासाठी बुक माय शोवरुन आताच ऍडव्हान्स तिकीट बुक करा'. त्यांच्या या पोस्टमुळे उद्या पहिल्याच दिवशी चित्रपटाला हाऊसफुल्लची पाटी लागणार असे दिसते आहेत.

झी स्टुडिओज आणि अथांश कम्युनिकेशनची निर्मिती असलेल्या आणि रवी जाधव (Ravi Jadhav) यांच्या दिग्दर्शनाने सजलेल्या या चित्रपटात दगडूच्या भूमिकेत आपला लाडका प्रथमेश परब (Prathamesh Parab) आहे तर पालवीची भूमिका तरुणाईच्या 'दिल की धडकन' अशी ओळख असणाऱ्या हृता दुर्गुळे (Hruta Durgule) हिने साकारली आहे. विशेष म्हणजे आजवर कधीच न बघितलेल्या अवतारात हृता आपल्याला यात दिसणार आहे. याव्यतिरिक्त चित्रपटात माधव लेले उर्फ शाकाल म्हणजेच वैभव मांगले, (vaibhav mangle) शांताराम परब म्हणजे भाऊ कदम (Bhau kadam), आरती वडगबाळकर, दगडू गॅंग आणि एका जबरदस्त भूमिकेत संजय नार्वेकर बघायला मिळणार आहेत.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com