'अरे हम गरीब हुए तो क्या हुए दिल से आमीर है अमीर'; टाईमपास ३ लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस.

Ravi Jadhav
Ravi Jadhav

मराठी चित्रपट सृष्टीतील टाईमपास या चित्रपटाला खूप लोकप्रियता मिळाली. या चित्रपटाचे दोन भाग प्रदर्शित झाले होते. दोन्ही भागांना प्रेक्षकांचा उत्तम प्रतिसाद मिळाला. या चित्रपटाच्या पहिल्या भागात प्रथमेश परब, वैभव मांगले, केतकी माटेगावकर, भाऊ कदम, मेघना एरंडे अशी तगडी स्टार कास्ट होती. हा भाग २०१४ साली प्रदर्शित झाला. या भागातील दघडूची ही प्रमुख भूमिका प्रथमेश परबने तर प्राजूची भूमिका केतकी माटेगावकरने केली आहे. या दोघांच्या लव्ह स्टोरीला प्रेक्षकांची पसंती मिळाली.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

या चित्रपटातील डायलॅाग प्रेक्षकांच्या आजही लक्षात आहेत. ‘नया है वह’, 'आरे हम गरीब हुए तो क्या हुए दिल से आमीर है आमीर', 'आई बाबा आनि साईबाबाची शप्पथ' हे या चित्रपटातील  डायलॅाग प्रसिध्द आहेत. उत्तम संगित, संवाद आणि कलाकारांचा अभिनय या सर्व गोष्टींमुळे टाईमपासच्या पहिल्या भागाने जोरदार कमाई केली.

त्यानंतर २०१५ साली टाईमपासचा दुसरा भाग प्रदर्शित झाला. यात मोठ्या दगडूची भूमिका प्रियदर्शन जाधव तर प्राजूची भूमिकेत अभिनेत्री प्रिया बापट होती. याही चित्रपटाने प्रेक्षकांचे मन झिंकले. 

टाईमपासच्या दोन्ही भागांच्या यशानंनतर या चित्रपटाचे दिग्दर्शक रवी जाधव यांनी तिसऱ्या भागाची घोषणा केली आहे. या भागाचे चित्रीकरणं लवकरच सुरू होणार आहे असे रवीने सोशल मिडीयावर पोस्ट केले आहे. या चित्रपटाचे पोस्टर मराठी अभिनेत्री ऋता दुर्गुळेने सोशल मिडीयावर शेअर केले आहे.या चित्रपटात ऋता प्रमुख भूमिकेत दिसणार आहे अशी चर्ची सध्या सोशल मिडीयावर सूरू आहे. पण दगडू आणि प्राजू ही जोडी पुन्हा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.

Edited By - Prashant Patil

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com