Allu Arjun On Bollywood: पुष्पा म्हणतो,आमची तुलना बॉलीवूडशी होईलच कशी! |Tollywood Actor Allu Arjun Comment | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Allu Arjun on Bollywood

Allu Arjun On Bollywood: पुष्पा म्हणतो,आमची तुलना बॉलीवूडशी होईलच कशी!

Allu Arjun on Bollywood Vs South Cinema: बॉलीवूड विरुद्ध टॉलीवूड सध्या मोठ्या प्रमाणावर वाद सुरु आहे, गेल्या काही महिन्यांपासून टॉलीवूडच्या वेगवेगळ्या चित्रपटांनी (bollywood News) बॉलीवूडला हादरवून टाकले आहे. बॉक्स ऑफिसवर प्रचंड कमाई (Tollywood News) करणाऱ्या टॉलीवूडच्या चित्रपटांनी बॉलीवूडला नामोहरम केले आहे. (entertainment news) सध्याच्या घडीला बॉलीवूडचा एकही चित्रपट प्रचंड कमाई करु शकलेला नाही. याचे कारण गेल्या तीन ते चार महिन्यांपासून टॉलीवूडच्या अॅक्शन पटांनी बॉलीवूडच्या प्रेक्षकांना हँग करुन टाकले आहे. त्याचा प्रभाव अद्याप आहे. गेल्या वर्षी अल्लु अर्जुनचा पुष्पा आला होता. त्यानं विक्रमी कमाई केली. त्यानंतर राजामौली यांच्या आरआरआर आणि केजीएफ 2 ने तर झोप उडवली आहे. (Allu Arjun on Bollywood)

टॉलीवूडच्या एकामागोमाग येणाऱ्या चित्रपटानं बॉक्स ऑफिस काबीज केलं आहे. त्याचा परिणाम बॉलीवूडच्या कमाईवर झाला आहे. त्यावरुन बॉलीवूडमधील अनेक दिग्गज सेलिब्रेटींनी नाराजी व्यक्त केली होती. त्यात सलमान खान, आमिर खान या प्रमुख अभिनेत्यांचा समावेश करावा लागेल. अजय देवगणचा रन वे 34 आज प्रदर्शित होणार आहे. त्यावरुन हिंदी भाषेच्या नव्या वादाला तोंड फुटल्याचे दिसून आले आहे. त्याला आता राजकीय रंग चढला आहे. अजय आणि सुदीप यांच्या वादात टॉलीवूडचे सेलिब्रेटी उतरले आहे. पुष्पा फेम अल्लु अर्जुननं दिलेली प्रतिक्रिया चर्चेत आली आहे.

अल्लु अर्जुननं दिलेल्या एका मुलाखतीमध्ये टॉलीवूड आणि बॉलीवूड यातील फरक समजावून देत आपली रोखठोक प्रतिक्रिया दिली आहे. तो म्हणतो, मुळात दोन्ही फिल्म इंडस्ट्रीची तुलना करणे चूकीचे आहे. बॉलीवूडचा जॉनर वेगळा आहे. ते वेगळ्या विषयांवर आधारित चित्रपट तयार करतात. आमचा जॉनर वेगळा आहे. मांडणी वेगळी आहे. प्रेक्षकांना जे आवडते त्याला त्यांची दाद मिळते. त्यांच्या आवडीनुसार चित्रपट तयार करावे लागतात. त्यामुळे प्रत्येकवेळी आपण यशस्वी होऊ असे होत नाही. तुम्ही साऊथचा कोणताही चित्रपट घ्या त्यामध्ये तुम्हाला एक टिपिकल मसाला दिसेल. ती त्या चित्रपटांची ओळख आहे. तो एक वेगळा फ्लेवर आहे. आणि आम्ही तो प्रत्येक वेळी प्रेक्षकांना देतो. त्यामुळे बॉलीवूड आणि टॉलीवूडची तुलना होईल कशी, असा प्रश्न अल्लुनं विचारला आहे.