Nandamuri Taraka Ratna: 'नंदामुरी तारका रत्न यांच्या जाण्यानं', नरेंद्र मोदींनी वाहिली श्रद्धांजली

Nandamuri Taraka Ratna
Nandamuri Taraka RatnaEsakal

PM Modi On Nandamuri Taraka Ratna: दक्षिणेतील प्रसिद्ध अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे शनिवारी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने सिनेसृष्टीतील स्टार्सना धक्का बसला आहे. नंदामुरी तारका रत्न यांच्या निधनावर अनेक कलाकारांनी श्रद्धांजली वाहिली आहे आणि त्यांच्यासोबतच्या आठवणी शेअर केल्या आहेत.

Nandamuri Taraka Ratna
Aditi Rao Hydari: 'तुझ्यात अन् सिद्धार्थमध्ये काय चाललयं?', आदिती लाजली अन् म्हणाली, 'मला आता ..'

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही त्यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. या पीएमओने ट्विट करून लिहिले आहे, “नंदामुरी तारका रत्न यांच्या अकाली निधनाने खूप दुःख झाले. चित्रपट आणि मनोरंजनाच्या दुनियेत त्यांनी एक वेगळी ओळख निर्माण केली. या दु:खाच्या वेळी त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत माझ्या संवेदना आहेत. ओम शांती."

Nandamuri Taraka Ratna
Sunny Leone: तुर्की-सीरियातील भूकंपग्रस्तांच्या मदतीला सनी लिओनी धावली..

अंत्यविधीसाठी नंदामुरी तारका रत्न यांचं पार्थिव हैदराबादमधल्या मोकिला परिसरातील त्यांच्या निवासस्थानी आणण्यात आलं आहे. तारका रत्न यांचा चुलत भाऊ ज्युनियर एनटीआर, भाऊ नंदमुरी कल्याणराम आणि दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील इतरही कलाकार पोहोचले आहेत.

Nandamuri Taraka Ratna
Shehzada Box Office Collection Day 2: 'शहजादा' चे लाड 'पठाण' पुढे चालेना! दुसऱ्या दिवशी किती कमावले?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, 39 वर्षीय नंदामुरी तारका रत्न यांना 27 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशमधील एका राजकीय सभेदरम्यान हृदयविकाराचा झटका आला. तेव्हापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र इतके दिवस त्यांच्या प्रकृतीत सुधारणा न झाल्याने १८ फेब्रुवारी रोजी त्यांचे निधन झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com