
Nandamuri Taraka Ratna Passes Away : दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे निधन
दाक्षिणात्य अभिनेते नंदामुरी तारका रत्न यांचे रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. वयाच्या 39 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. नंदामुरी यांना 27 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या निधनाने दाक्षिणात्य सिनेसृष्टीवर शोककळा पसरली आहे.
नंदामुरी यांना 27 जानेवारीला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना कुप्पम येथील एका रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा व्हावी यासाठी कुटुंबियांसोबत चाहतेदेखील प्रार्थना करत होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खलावल्यामुळे त्यांचे निधन झाले.
नंदामुरी तारका रत्न यांनी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील अनेक लोकप्रिय सिनेमांमध्ये काम केलं आहे. त्यामुळे त्यांच्या निधनाने चाहत्यांसह दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील कलाकारांकडून शोक व्यक्त केला जात आहे.
नंदामुरी हे एका पक्षाच्या पदयात्रेमध्ये सामील झाले होते. त्यावेळी गर्दीमुळे त्यांचा श्वास गुदमरला आणि ते बेशुद्ध झाले. त्यावेळी त्यांना हृदयविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. हृदयविकाराच्या झटक्यानंतर ते कोमामध्ये गेले होते.
नंदामुरी तारका रत्न यांनी प्रेक्षकांचं मनोरंजनासोबतच त्यांनी राजकारणातदेखील नशिब आजमावलं होतं. दाक्षिणात्य अभिनेता ज्यूनिअर एनटीआरचे ते चुलत भाऊ होते. तर आंधप्रदेशचे माजी मुख्यमंत्री नंदामुरी तारका रामाराव यांचे ते नातू होते. त्यांची प्रकृती गंभीर असल्याने अनेक कलाकार, राजकारणी मंडळी त्यांची विचारपूस करण्यासाठी रुग्णालयात जात होते.