'वकिल साब'' रिलिज; अमेरिकेत वाजले फटाके, भारतात चित्रपट पाहण्यासाठी चेंगराचेंगरी   

tollywood actor pawan kalyan vakeel saab movie released pink remake entertainment
tollywood actor pawan kalyan vakeel saab movie released pink remake entertainment

मुंबई - बॉलीवूडच्या तुलनेत टॉलीवूडमधील प्रेक्षकांचं चित्रपटवेड थक्क करणारं आहे. आपल्या आवडत्या कलाकाराचा एखादा चित्रपट जर प्रदर्शित होणार असेल त्याच्या चित्रपटाचं जंगी स्वागत केले जाते. तसा तिकडे प्रघातच आहे की काय असा प्रश्न पडतो. काही दिवसांपूर्वी लायगर चित्रपटाचा टीझर प्रदर्शित झाला होता त्यावेळी चाहत्यांनी मोठ्या प्रमाणात आनंदोत्सव साजरा केला होता. तो आनंदोत्सव काही साधासुधा नव्हता. अनेकांनी त्या चित्रपटातील प्रमुख अभिनेता विजय देवराकोंडाच्या पोस्टरला दुधाचा अभिषेक घातला होता. केक कापून त्याच्या नव्या चित्रपटासाठी शुभेच्छाही दिल्या होत्या. आताही असाच प्रकार अभिनेता पवन कल्याणच्या वकिल साबच्या बाबत घडला आहे.

शुक्रवारी, 9 एप्रिलला त्याचा वकिल साब नावाचा चित्रपट प्रदर्शित झाला. त्याला मोठा प्रतिसाद मिळाला आहे. यापूर्वी जेव्हा या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता त्यावेळी तो खास थिएटरमध्ये प्रदर्शित करण्यात आला होता. त्यावरुन त्याच्या लोकप्रियतेचा अंदाज येईल. पवन कल्याणचा मोठा चाहता वर्ग आहे. सोशल मीडियावर तो अॅक्टिव्ह असतो. वकिल साब केवळ भारतातच नाही जर जगभरात प्रदर्शित झाला. अमेरिकेतील अटलांटा येथे तर फटाके फोडून त्याच्या चित्रपटाचे स्वागत करण्यात आल्याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्यालाही पवनच्या चाहत्यांकडून शेकडो लाईक्स आणि कमेंटस मिळाल्या आहेत.

जेव्हा सोशल मीडियावर वकील साबच्या ट्रेलर प्रदर्शित झाला तेव्हा त्याची मोठी हवा होती.   बॉलीवूडमधल्या पिंक चित्रपटाचा रिमेक असणा-या या चित्रपटाची सर्वांना उत्सुकता लागली होती. याशिवाय तो ट्रेलरही अनेकांच्या पसंतीस पडला. विशेष म्हणजे पावर स्टार पवन कल्याण हा ब-याच कालावधीनंतर मोठ्या पडद्यावर दिसतो आहे.  हा चित्रपट लोकप्रिय चित्रपट पिंकचा रिमेक असल्याची चर्चा आहे. पिंक या वेगळ्या धाटणीच्या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर चाहत्यांचा प्रतिसाद मिळाला होता. आता पवनच्या या नव्या चित्रपटाविषयीचे कुतूहल होते. त्यालाही सध्या प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. मंगळवारी वकील साब चा ट्रेलर प्रदर्शित झाला होता.

पवन कुमार यांचा वकिल सहाब हा  प्रसिध्द बॅालिवूड चित्रपट पिंक चा अॅाफिशल तेलगू रिमेक आहे. या चित्रपटात पवण कल्याण यांच्या सोबत अंजली, निवेश थॅामस, अनन्या आणि प्रकाश राज सारखी तगडी स्टार कास्ट दिसणार आहे. पिंकमध्ये अमिताभ  बच्चन आणि तापसि पन्नूच्या अभिनयाने प्रेक्षकांचे मन जिंकले होते. आता वकिल सहाब हा चित्रपट पिंक प्रमाणेच प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान निर्माण करेल का हे लवकरच समजेल. वकिल सहाब हा चित्रपट वेणू श्रीराम यांनी दिग्दर्शित केला आहे. दिल राजू आणि बोनी कपूर यांनी या चित्रपटाची निर्मिती केली आहे.     
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com