भल्लालदेव होण्यासाठी खायचा 40 अंडी, 8 वेळा जेवायचा

बाहूबली (bahubali) चित्रपटानं भारतीय चित्रपट सृष्टीला एक वेगळं परिमाण दिलं असं म्हणायला हरकत नाही.
भल्लालदेव होण्यासाठी खायचा 40 अंडी, 8 वेळा जेवायचा

मुंबई - बाहूबली (bahubali) चित्रपटानं भारतीय चित्रपट सृष्टीला एक वेगळं परिमाण दिलं असं म्हणायला हरकत नाही. आतापर्य़त सर्वाधिक व्यवसाय करणारा चित्रपट म्हणून बाहुबलीचं नाव घ्यावं लागेल. प्रेक्षकांचा मोठा प्रतिसाद या चित्रपटाला मिळाला होता. एस राजामौली यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. बाहुबलीच्या दोन्ही भागांना मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्यातील प्रभास आणि दग्गुबाती (rana dauggubati) यांच्या अभिनयाला प्रेक्षकांचा प्रतिसाद मिळाला. त्यांची स्टाईल, संवाद याची कॉपी होऊ लागली. त्यामुळे बाहुबली हा एक ट्रेंड सेटर मुव्ही झाला. आज या चित्रपटातील व्हिलनची भूमिका करणारा भल्लालदेव अर्थात राणा दग्गुबातीचा जन्मदिन आहे. त्याविषयी आपण अधिक जाणून घेणार आहोत.

केवळ भारतातच नाही तर जगभरामध्ये बाहुबलीला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळाला. जवळपास आठ भाषांमध्ये तो प्रदर्शित झाला होता. त्यातील भल्लालदेवची चर्चा प्रेक्षकांच्या आवडीचा विषय होता. त्यानं प्रभावीपणे खलनायकाची भूमिका साकारली होती. प्रेक्षकांना ती कमालीची भावली देखील. कट्टापा आणि भल्लालदेव हे बाहुबलीतील प्रेक्षकांची आवडती पात्रं होती. भल्लालदेवची भूमिका साकारताना राणानं मोठी मेहनत केली होती. त्यानं नेटानं वर्क आऊट केलं. वजन वाढवलं. आहारातही बदल केला होता. त्यापूर्वी अतिशय मोजून मापून खाणारा राणा भल्लालदेव होण्यासाठी मोठा आहार घेऊ लागला. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीमध्ये त्यानं याविषयी सविस्तर सांगितलं आहे.

राणानं (rana dauggubati) सांगितलं होतं की, मला जेव्हा दिग्दर्शकानं आपल्याला भल्लालदेवची भूमिका करायची आहे असं सांगितलं होतं तेव्हा मी हादरुन गेलो होतो. कारण मला त्यामध्ये बॉडी टान्सफॉर्मेशन करायचे होते. मात्र मी त्यासाठी स्वताला तयार केले. त्यानुसार तयारीही केली. आहारात मोठ्या प्रमाणावर बदल केले. 14 डिसेंबर 1984 साली जन्म झालेल्या राणानं आता टॉलीवूडमध्ये स्वताचे स्थान निर्माण केले आहे. राणा हा एक चांगला फोटोग्राफर देखील आहे. त्याला भटकंतीची आवड देखील आहे.

भल्लालदेव होण्यासाठी खायचा 40 अंडी, 8 वेळा जेवायचा
बाहुबलीचा 'भल्लालदेव' पाकिस्तान बॉर्डरवर ; बीएसएफच्या वर्दीत
भल्लालदेव होण्यासाठी खायचा 40 अंडी, 8 वेळा जेवायचा
साउथ लेडी सुपरस्टार 'बाहुबली' फेम अनुष्का शेट्टी!

बाहुबलीविषयी आहारात केलेल्या बदलाविषयी सांगताना राणा म्हणाला, मी त्या भूमिकेसाठी शंभर किलो वजन केले होते. त्यासाठी जिममध्ये काही तास घालवले. मला माझ्या आहारतज्ञानं रोज 40 अंडी खाण्यास सांगितली. याशिवाय दर दोन तासांनं काही ना काही खाण्याचा सल्ला दिला होता. मी जवळपास दिवसांतून आठवेळा जेवत असल्याचेही राणानं सांगितलं होतं.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com