अभिनेत्रीचं लैंगिक शोषण करुन टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय बाबू फरार|Tollywood Actor Vijay Babu accused | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tollywood Actor Vijay Babu

अभिनेत्रीचं लैंगिक शोषण करुन टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय बाबू फरार

Tollywood News: टॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता विजय बाबू (Viajy Babu) हा आता अडचणीत सापडला आहे. त्याच्यावर एका महिलेनं लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत. यासगळ्या प्रकारामुळे विजय बाबूची डोकेदुखी वाढली आहे. सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी त्याला (Entertainment News) ट्रोल करण्यास सुरुवात केली आहे. त्यानं या आरोपाचं खंडन करताना कुणीतरी जाणीवपूर्वक असे प्रकार करत आहे. आपण देखील यासगळ्या प्रकारात भरडलो (Social Media News) गेल्याचे सांगितले आहे. मल्याळम अभिनेता म्हणून विजय बाबू सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकप्रिय आहे. केरळ पोलिस ठाण्यामध्ये त्याच्यावर गुन्हा (Tollywood Actor) दाखल करण्यात आला आहे. 22 एप्रिल रोजी एका पीडितेनं त्याच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केले आहेत.

केरळमधील कोची याठिकाणी विजय बाबूनं आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याची तक्रार त्या पीडीतेनं केली आहे. त्यामुळे विजयच्या चाहत्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. सोशल मीडियावर ही बातमी व्हायरल झाली आहे. पीडित तक्रारदारानं सांगितलं आहे की, आपल्याला एका चित्रपटामध्ये रोल देण्याच्या बहाण्यानं त्यानं आपल्याशी जवळीक साधली आणि गैरवर्तन केले. त्यानं अनेकदा असे प्रकार केले आहेत. मात्र विजय हा लोकप्रिय कलाकार असल्यानं त्याच्याशी संबंधित तक्रारीची नोंद कुणी घेण्यास तयार नसल्याचे सांगण्यात आले. आता मिळालेल्या माहितीनुसार, विजय हा फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. विजय बाबुनं फेसबूक लाईव्ह करत आपली भूमिका मांडली आहे.

हेही वाचा: Video Viral: रणबीर-आलियाचा लग्नातील 'वरमाला समारंभ' पाहिलात का?

सोशल मीडियावरुन विजयनं सांगितलं आहे की, मी स्वताच पीडित आहे. माझ्यावर जे आरोप करण्यात आले आहे ते पूर्णपणे चूकीचे आहे. ते वेगळ्या कारणासाठी करण्यात येत आहे. मी त्यालाही उत्तर देणार आहे. पोलिसांनी विजयच्या विरोधात गुन्हा दाखल करुन त्याच्याविरोधात अटक वॉरंट देखील जाहिर केल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे. मात्र तो फरार असल्यानं अद्याप त्याला अटक करण्यात आलेली नाही. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्यानं त्या फेसबूक लाईव्हमध्ये संबंधित व्यक्तीचे नावही घेतले आहे. विजयनं यावेळी देशाच्या कायद्यावर देखील ताशेरे ओढत त्यावर नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा: Photo viral - तारक मेहतामधील बाबुलालच्या मुलीचं लग्न, चर्चा तर होणारच!

Web Title: Tollywood Actor Vijay Babu Accused Sexual Assault Kerala Police Filed Fir Social Media Viral

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top