कोण आहे रश्मिका मंदानाचा जोडीदार? डेटिंगचे फोटो व्हायरल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

rashmika mandana
कोण आहे रश्मिका मंदानाचा 'छावा'?, डेटिंगचे फोटो व्हायरल

कोण आहे रश्मिका मंदानाचा जोडीदार? डेटिंगचे फोटो व्हायरल

Rashmika Mandana Vijay Deverkonda : टॉलीवूडमध्ये (Tollywood) आपल्या अभिनयानं प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेणारे सेलिब्रेटी म्हणून रश्मिका आणि विजय देवरकोंडाचे (Rashmika And Vijay Deverkonda) नाव घ्यावे लागेल. आगामी काळात विजय देवरकोंडाचा लायगर (Liger) हा चित्रपट येणार आहे. त्यामध्ये अनन्या पांडे आणि रश्मिका मंदाना यांच्या प्रमुख भूमिका आहेत. गेल्या काही दिवसांपासून या दोघांच्या रिलेशनशिपवरुन चर्चा सुरु आहे. मात्र त्या दोघांनी या गोष्टीचा खुलेपणानं स्वीकार केलेला नाही. त्यांनी आपण दोघेही चांगले मित्र आहोत असेच सांगितलं आहे. नेटकऱ्यांना त्यांच्यातील नात्याची कुणकुण लागली आहे.

रश्मिका आणि विजयच्या जोडीला नेहमीच प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. त्या दोघांनी यापूर्वी गीत गोविंदम, डियर कॉम्रेड सारख्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे. त्यावेळी त्यांच्याविषयी वेगवेगळ्या प्रकारच्या चर्चा समोर आल्या होत्या. मात्र त्यांनी नेहमीच एकमेकांना चांगले मित्र असल्याचे सांगितलं आहे. मात्र नेटकऱ्यांना असे वाटते की, रश्मिका आणि विजय एकमेकांच्या प्रेमात आहेत. एक जानेवारीला रश्मिका आणि विजय देवरकोंडानं समुद्रकिनारी दोघांचा एकत्रित असलेला फोटो शेयर केला आहे. त्याला नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिक्रियाही दिल्या आहेत.

हेही वाचा: कंगणाने केली पुन्हा टिवटिव; '' India Reject Bollywood'' हॅशटॅग मधून निषेध

रश्मिकाच्या वर्क फ्रंटविषयी बोलायचं झाल्यास ती आता लवकरच हिंदी चित्रपटमध्ये दिसणार आहे. बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन आणि नीना गुप्ता यांच्यासमवेत ती गुडबाय तर सिद्धार्थ मल्होत्रासोबत मिशन मजनुमध्ये देखील दिसणार आहे. विजय देवरकोंडाच्या आगामी लायगरमध्ये देखील तिची प्रमुख भूमिका प्रेक्षकांन पाहायला मिळणार असून त्यामध्ये अनन्या पांडेदेखील असणार आहे.

हेही वाचा: 'RRR'चं प्रदर्शन पुन्हा पुढे ढकललं; प्रेक्षकांना करावी लागणार आणखी प्रतीक्षा

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
loading image
go to top