Vijay Babu: केरळ हायकोर्टाकडून दिलासा, अटकपूर्व जामीन मंजुर

टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता विजय बाबुला अखेर केरळ (Vijay Babu) हायकोर्टानं दिलासा दिला आहे.
Tollywood news actor Vijay babu
Tollywood news actor Vijay babu esakal

Tollywood News: टॉलीवूडमधील प्रसिद्ध अभिनेता (Vijay Babu) हायकोर्टानं दिलासा दिला आहे. त्यानं गेल्या काही दिवसांपासून अटक पूर्व जामीन मिळावा अशी मागणी कोर्टाकडे केली होती. प्रकरणाची गंभीरता लक्षात घेता त्याला जामीन नाकारण्यात आला होता. त्यानंतर पुन्हा अर्ज (Bollywood News) केल्यानंतर त्याला अखेर केरळ हायकोर्टानं अटकपूर्व जामीन दिल्याची माहिती समोर आली आहे. मल्याळम चित्रपटांमधून वेगवेगळ्या भूमिका कऱणारा अभिनेता म्हणून विजयची ओळख आहे. त्याचा चाहतावर्ग मोठा आहे. सोशल मीडियावर देखील त्याला फॉलो करणाऱ्या नेटकऱ्यांची संख्याही मोठी आहे.

22 एप्रिल रोजी एका अभिनेत्रीनं विजय बाबुवर लैंगिक अत्याचाराचा आरोप केला होता. त्यामुळे पोलिसांनी त्याच्याकडे चौकशी सुरु केली होती. काही काळ विजय (Tollywood Actor) हा फरार असल्याची बातमी समोर आली होती. आपल्यावर झालेले आरोप हे खोटे असून त्यात आपल्याला अडकवण्यात आले आहे. संबंधित पीडितेवर जर खरच अन्याय झाला असेल तर त्या व्यक्तीनं केव्हाच तक्रार दाखल करणे अपेक्षित होते. असे म्हणत विजयनं फिर्यादीवर वेगवेगळ्या प्रकारचे आरोप केल्याचे समोर आले आहे. चित्रपटामध्ये आपल्याला भूमिका देण्याचे आमिष दाखवून लैंगिक छळ केल्याचा आरोप फिर्यादी महिलेनं विजयवर केले आहेत.

Tollywood news actor Vijay babu
Viral Video: शिल्पाला असं कधी पाहिलयं?

लैंगिक छळासोबत विजयनं फिर्यादी महिलेला ड्रग्ज घेण्यासाठी देखील प्रवृत्त केल्याचे फिर्यादीमध्ये म्हटले आहे. सोशल मीडियावर अभिनेता विजयवर मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली आहे. त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच सुनावले आहे. यासगळ्या आरोपांचे विजयनं खंडन केले आहे. आपण निर्दोष असून याप्रकरणामध्ये गोवण्यात आल्याच आरोप फिर्यादीवर विजयनं केला आहे.

Tollywood news actor Vijay babu
Video : Eknath Shinde यांच्या बंडानंतर Sanjay Raut यांच्या घराबाहेरील फलक व्हायरल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com