मुलीचा बर्थ डे, खर्च तर होणारच; 'बुर्ज खलिफावर' सेलिब्रेशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुलीचा बर्थ डे, खर्च तर होणारच; 'बुर्ज खलिफावर' सेलिब्रेशन
मुलीचा बर्थ डे, खर्च तर होणारच; 'बुर्ज खलिफावर' सेलिब्रेशन

मुलीचा बर्थ डे, खर्च तर होणारच; 'बुर्ज खलिफावर' सेलिब्रेशन

सध्या सोशल मीडियावर टॉलीवूडमधल्या एका सुपरस्टारची चर्चा आहे. ती म्हणजे तेलुगू सुपरस्टार अल्लु अर्जुनच्या मुलीच्या बर्थ डे सेलिब्रेशनची. त्याचे फोटो आणि व्हिड़िओ मोठ्या प्रमाणात सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. त्याला चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सही दिल्या आहेत. एरवी अल्लु तिच्या मुलीचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेयर करत असतो. त्याच्या मुलीचे नाव अरहा असं आहे. आणि साऊथमध्ये तिच्या नावाची मोठी क्रेझ आहे. तिच्या फोटोंना चाहते नेहमीच लाईक्स करत असतात. तिच्याविषयीच्या पोस्टला लाखो लाईक्स, कमेंट्स मिळाल्या आहेत.

काल अल्लुनं अरहाचा जन्मदिन दुबईतील बुर्ज खलिफावर साजरा केला आहे. त्याचे फोटो आणि व्हिडिओही त्यानं शेयर केले आहे. त्यावेळी त्याची पत्नी स्नेहा रेड्डी उपस्थित होती. अल्लु, स्नेहा, अयान आणि अरहा हे या सेलिब्रेशनमध्ये सहभागी झाले होते. यावेळी अल्लुनं एका मोठ्या पार्टीचे आयोजन केले होते. त्यात त्याचे मित्र सहभागी झाले होते. अल्लुनं शेयर केलेल्या फोटो आणि व्हिडिओला मोठ्या प्रमाणावर लाईक्स आणि कमेंट्स मिळाल्या आहेत.

जगातील सर्वाधिक उंच इमारत म्हणून बुर्ज खलिफाच्या नावाचा उल्लेख केला जातो. त्याला दरवर्षी लाखो पर्यटक भेटी देत असतात. त्या इमारतीची नेहमीच चर्चा असते. वास्तविक या इमारतीचा सर्वात वरचा मजला हा सर्वसामान्य लोकांसाठी खुला नाही. मात्र याठिकाणी पार्टी सेलिब्रेट करणारी अरहा ही पहिलीच सेलिब्रेटी असणार आहे.

हेही वाचा: तिसऱ्या लग्नासाठी आमिर खान तयार; कोण आहे ती अभिनेत्री?

loading image
go to top