टॉम क्रुझ 'या' सिनेमात 'मेड इन इंडिया' बाईक चालवताना दिसणार, व्हिडिओ व्हायरल

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Friday, 16 October 2020

हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रुझ सध्या 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाच्या सातव्या भागाचं शुटींग करण्यात बिझी असून त्याच्या चाहत्यांना या ऍक्शन पॅक्ड सिनेमाची खूप उत्सुकता आहे.

मुंबई- 'मिशन इम्पॉसिबल' या लोकप्रिय सिनेमाच्या सातव्या भागात टॉम क्रुझ मेड इन इंडिया बीएमडब्लू जी ३१० बाईकवर स्टंट करताना दिसणार आहे. हॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता टॉम क्रुझ सध्या 'मिशन इम्पॉसिबल' सिनेमाच्या सातव्या भागाचं शुटींग करण्यात बिझी असून त्याच्या चाहत्यांना या ऍक्शन पॅक्ड सिनेमाची खूप उत्सुकता आहे. या सिनेमात नेहमीप्रमाणेच अति वेगवान थरारक पाठलाग करतानाचे सीन्स असतील आणि त्यात कोणत्या कार्स आणि बाईक्स पाहायला मिळणार याची उत्सुकता प्रेक्षकांना आहे.

हे ही वाचा: सुशांत मृत्यु प्रकरणात प्रतिमा मलिन करणार्‍यांवर संदीप सिंहचा मानहानीचा दावा  

या सिनेमाचं आणखी एक वैशिष्ट म्हणजे टॉम क्रुझ सर्व ऍक्शन स्टंट डुप्लिकेट न घेता स्वतः करणार आहे. इटली मध्ये सुरु असलेल्या शुटींग मध्ये टॉम क्रुझ बीएमडब्ल्यू जी ३१० बाईक चालवताना दिसून आला आहे. ही बाईक भारत व इतर आंतरराष्ट्रीय बाजारांसाठी भारताच्या होसूर येथील टीव्हीएसच्या प्रकल्पात उत्पादित केली जाते.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Olga_ ritm (@olga__avventura) on

केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांनी या संदर्भात ट्विटरवर पोस्ट केली असून त्यांनी लिहिलंय, 'मेक इन इंडिया, मिशन इम्पॉसिबल मिशन पॉसिबल बनवत आहे. टॉम क्रुझ भारतात बनलेली बाईक चालविताना पहा.' ही बाईक इटालियन पोलीस पेट्रोलिंगसाठी वापरतात. विविध कलर स्कीम, अलर्ट लाईट्स आणि साईड पॅनीअर्स असे फिचर्स या बाईकला दिले गेले आहेत.

tom cruise to ride made in india bmw g 310 gs in mission impossible  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tom cruise to ride made in india bmw g 310 gs in mission impossible