बॉक्स ऑफिसवर येणार फरहानचं 'तूफान', रिलिज डेट व्हायरल

यापूर्वी अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या.
toofan hindi movie
toofan hindi movie Team esakal

मुंबई - बॉलीवूडचा प्रसिध्द अभिनेता आणि दिग्दर्शक फरहान अख्तरचा (bollywood actor farhan akhtar) तूफान (toofan) हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटात फरहाननं एका बॉक्सरची भूमिका केली आहे. यापूर्वी राकेश ओमप्रकाश मेहरा (rakesh omprakash mehara) यांनी फरहानला घेऊन आठ वर्षांपूर्वी भाग मिल्खा भाग नावाचा सिनेमा तयार केला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. त्याला बॉक्स ऑफिसवरही यश मिळाले होते. (toofan new release date announced farhan akhtar rakesh mehra prime video)

16 जुलैला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. फरहाननं आपल्या सोशल मीडिया (social media) अकाउंटवरुन ही माहिती दिली आहे. यापूर्वी अनेकदा या चित्रपटाच्या प्रदर्शनाच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या होत्या. त्यामुळे निर्माते आणि दिग्दर्शक यांच्या डोकेदुखीत वाढ झाली होती. आता फरहानचा तूफान बॉक्स ऑफिसवर तूफान करण्यासाठी सज्ज झाला आहे. प्रेक्षकांना या चित्रपटाची उत्सुकता आहे.

तूफानच्या दिग्दर्शनाची कमान प्रसिध्द दिग्दर्शक राकेश ओमप्रकाश मेहरा यांनी सांभाळली आहे. मिर्झ्या आणि मेरे प्यारे प्राइम मिनिस्टर्स हा त्यांच्या फिल्म फ्लॉप झाल्या होत्या. प्रेक्षकांनी त्या चित्रपटांकडे पाठ फिरवली होती. तूफानच्या पोस्ट प्रॉडक्शनचे काम पूर्ण झाले आहे. हा चित्रपट गेल्या काही महिन्यांपासून प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. मात्र त्याला त्यात यश आलेलं नाही. कोरोनाचा परिणाम मनोरंजन क्षेत्रावर झाला आहे. त्यामुळे अनेक चित्रपटांना तारखा मिळत नसल्याचे दिसुन आले आहे.

toofan hindi movie
'वडिलांनी दुसरं लग्न केल्यावर आईचा आत्महत्येचा प्रयत्न'

काही दिवसांपूर्वी तूफानचा टीझर प्रदर्शित झाला होता. त्याला प्रेक्षकांचा मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद मिळाला होता. गेल्या काही दिवसांपासून फरहानच्या चित्रपटाची प्रेक्षक वाट पाहत आहेत. त्या टीझरमध्ये त्यानं हॉलीवूडच्या सिल्वेस्टर स्टॅलोनचीही झलक दाखवली होती. प्रेक्षकांच्या ती पसंतीस पडली होती. त्या टीजरमध्ये मोहम्मद अलींचा फोटो दाखवण्यात आला होता. यापूर्वी बॉलीवूडमध्ये मिथून चक्रवर्ती यांचा बॉक्सर नावाचा चित्रपट आला होता. त्यावेळी प्रेक्षकांची त्याला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळाली होती.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com