सलमानच्या ट्युबलाईटचा ट्‌विटर इमोजी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 मे 2017

मुंबई सलमान खानची लोकप्रियता लक्षात घेऊन त्याच्या आगामी ट्युबलाईट या सिनेमासाठी ट्विटरने खास इमोजी आणला आहे. यात सलमानचा चेहरा असून, या सिनेमातली त्याची सॅल्यूटची पोज येथे वापरण्यात आली आहे. ट्युबलाईटचा दिग्दर्शक कबीर खान याने ही माहिती ट्विटरवरुन दिली. विशेष बाब अशी की, एखाद्या हिंदी सिनेमातलं कॅंरेक्‍टर उचलून इमोजी करण्याची ही पहिलीच वेळ आहे. 

अभिनेता सलमान खान यानेही ट्विटरच्या या नव्या इमोजीबद्दल आनंद व्यक्त केला असून,अब यह इमोजी ट्विटर को लाइट कर देगा असं ट्विट केलं आहे. हा सिनेमा ईदच्या दिवशी प्रदर्शित होणार आहे. सलमानसह या सिनेमात सोहेल खानची भूमिका असून, यात शाहरुख खाननेही एक छोटी भूमिका साकारली आहे. हा सिनेमा बाहुबलीला टक्कर देणारा ठरु शकतो, अशी चर्चा बॉलिवूडमध्ये रंगत आहे. 

Web Title: Tubelight emoji is on twitter