ईशा आणि विक्रांतच्या प्रेमाचा असा झाला शेवट

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 21 जुलै 2019

‘तुला पाहते रे’ या मालिकेने शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेल्या सुबोध भावेला आणि ईशा निमकरची भूमिका साकारलेल्या गायत्री दातारला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळाला. विक्रांतचा खरा चेहरा कळल्यावर ईशा त्याला माफ केले का आणि त्यानंतर विक्रांतने उचललेले पाऊल हो लोकांना पाहायला मिळाले. 

मुंबई : सध्या छोट्या पडद्यावरील अनेक लोकप्रिय मालिका निरोप घेत असून, यापैकीच एक 'तुला पाहते रे'मधील ईशा आणि विक्रांत यांच्या प्रेमाचा शेवट आपल्याला पाहायला मिळाला. शेवटच्या भागात काय होणार याबाबत सर्वांना उत्सुकता होती यावरील अखेर पडदा उठला. 

‘तुला पाहते रे’ या मालिकेने शनिवारी प्रेक्षकांचा निरोप घेतला. यामध्ये विक्रांत सरंजामेची भूमिका साकारलेल्या सुबोध भावेला आणि ईशा निमकरची भूमिका साकारलेल्या गायत्री दातारला प्रेक्षकांचा खूप पाठिंबा मिळाला. विक्रांतचा खरा चेहरा कळल्यावर ईशा त्याला माफ केले का आणि त्यानंतर विक्रांतने उचललेले पाऊल हो लोकांना पाहायला मिळाले. 

ईशा ही राजनंदिनीचा पुनर्जन्म असल्याचे विक्रांतला तिच्या बाबांकडून समजते. हे कळल्यावर त्याला धक्काच बसतो. आपण केलेल्या कृत्यांमुळे अस्वस्थ होऊन विक्रांत आत्महत्येचे पाऊल उचलतो. मालिकेच्या शेवटच्या भागात विक्रांत आत्महत्या करतो आणि आता ईशा पुढील आयुष्य आनंदात जगत आहे, असा या मालिकेचा शेवट झाला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tula Pahate Re serial last episode