Marathi Serial: येत्या रविवारी 'झी मराठी'वर काय पाहाल? अशी असेल मनोरंजनाची मेजवानी..

प्रेक्षकांसाठी यंदाचा रविवार असेल खास..
tula shikvin changlach dhada and tu chal pudha zee Marathi Serial special episode sunday 11 june
tula shikvin changlach dhada and tu chal pudha zee Marathi Serial special episode sunday 11 junesakal

Marathi serial latest update: मालिका ह्या रटाळ असतात. असंही कुणीही कितीही बोललं तरी मालिकांची काही कमी झालेली नाही. आजही चांद्या पासून बांद्यापर्यंत घराघरात मालिका पाहत जातात.

मालिका फक्त गृहिणीच पाहतात असं काही नाही, आता बदलते विषय आणि दर्जेदार निर्मिती यामुळे पुरुष मंडळी ही अगदी मोठ्या प्रमाणात मालिका पाहतात. त्यातही सध्या 'झी' मराठीच्या मालिका चांगल्याच चर्चेत आहेत.

नावीन्यपूर्ण अक्षय, ग्रामीण भाषेचा लहेजा, यामुळे या वाहिनीवरील मालिका चांगल्याच लोकप्रिय आहेत. नुकतीच वाहिनीने काही प्रोमो शेयर केले. त्यावरून दिसतंय की यंदाचा रविवार हा विशेष असणार आहे.

(tula shikvin changlach dhada and tu chal pudha zee Marathi Serial special episode sunday 11 june)

tula shikvin changlach dhada and tu chal pudha zee Marathi Serial special episode sunday 11 june
Kiran Mane: तुकोबारायांची पालखी सजवायचं काम मुस्लीम बांधव करत आहेत, पण.. किरण माने यांची सणसणीत पोस्ट..

यंदाचा रविवार हा विशेष असणार आहे, कारण 'तुला शिकवीन चांगलाच धडा' आणि 'तू चाल पुढं' या दोन मालिकांचे विशेष भाग असणार आहेत. एकीकडे अधिपती आणि अक्षरा यांच्या नात्याची नवी चाहूल मिळणार आहे तर दुसरीकडे मयूरी आणि अश्विनी यांच्या नात्यातील विश्वासाला तडा जाणार आहे.

'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेत एक नवीन ट्विस्ट येणार आहे. ऐन लग्नाच्या दिवशी अधिपती आणि अक्षरा आपापल्या घरातून गायब झाले आहेत. भुवनेश्वरी आणि अक्षराच्या आई वडिलांना जबरदस्त धक्का बसलाय.

अक्षराचे अपहरण केलं आहे, तर तिला सोडवण्यासाठी अधिपती तिथं पोहोचला आहे. आता पुढे काय होणार, अधिपती अक्षराला वाचवणार का? ानी विशेष म्हणजे अक्षराला अधिपतीच्या प्रेमाची जाणीव होणार का.. हे पाहणे रंजक ठरणार आहे.

tula shikvin changlach dhada and tu chal pudha zee Marathi Serial special episode sunday 11 june
Dattu More: हास्यजत्रा फेम दत्तू मोरेला कशी पटली डॉक्टर बायको.. तेही पुण्यातली.. अशी आहे प्यारवाली लव्हस्टोरी

तर आणखी एक जबरदस्त वळण येणार आहे ते म्हणजे 'तू चाल पुढं' ह्या मालिकेत १ तासाच्या विशेष भागात प्रतीक मयुरीला पत्र पाठवतो आणि आपण पळून जायचं आहे असं सांगतो. मयुरी आई वडिलांचा विश्वासघात करून प्रतीकसोबत जायला तयार होते. त्यासाठी ती घरातले पैसे चोरते.

आता ते खरच पळून जाणार का, मयूरी लग्न करणार का आणि विशेष म्हणजे हे सगळं शिल्पीचं कारस्थान आहे, हे सगळ्यांना कळेल तेव्हा काय होणार हे पाहणे उत्कंठा वर्धक असेल. तेव्हा हे दोन खास भाग, येत्या रविवारी म्हणजेच 11 जून रोजी संध्या ७ पासून पाहता येतील.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com