Tunisha sharma: तुनिशाच्या जागी 'ही' प्रसिद्ध अभिनेत्री साकारणार राजकुमारी मरियमची भूमिका ?

Tunisha sharma
Tunisha sharmaEsakal

तुनिषा शर्माच्या मृत्यूने सर्वांनाच धक्का बसला. या प्रकरणात सहकलाकार शीजान खान याला पोलिसांनी अटक केली आहे. तुनिशा आणि शीझान हे दोघं टीव्ही शो 'अली बाबा: दास्तान-ए-काबुल'मध्ये मुख्य भूमिका साकारत होते, अशा परिस्थितीत दोन्ही कलाकारांच्या जाण्याने शोचे शूटिंग थांबवण्यात आले होते.

या शोचे बँक एपिसोड्स असल्याने, काही दिवस ते प्रसारित करण्यात येत होते मात्र आता निर्माते नव्या स्टार्ससह शोचे शूटिंग सुरू करणार आहेत. मुख्य अभिनेता म्हणून अभिषेक निगमचं नाव समोर आले असतानाच आता तुनिषाच्या जागी राजकुमारी मरियमच्या भूमिकेत अवनीत कौर या शोमध्ये दिसणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Tunisha sharma
Tunisha Sharma death case: तुनिशाच्या पैशांवर आई-काका मारायचे मजा ... मैत्रिणीचा मोठा खुलासा

शीजन खान यांच्या जागी अभिषेक निगमचे नाव निश्चितपणे समोर आले आहे, मात्र अद्याप अधिकृत दुजोरा मिळालेला नाही, त्यामुळे सत्य काय आहे, हे काही दिवसांतच कळेल, मात्र त्याची चर्चा मात्र सुरू आहे.

Tunisha sharma
Tunisha Sharma Case: "ती फक्त पैशांच्या मागे..." शिझानच्या बहिनीचे तुनिशाच्या आईवर गंभीर आरोप..

टीव्ही इंडस्ट्रीत अवनीत आणि अभिषेक लीड स्टार म्हणून या शोमध्ये दिसणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. असं झालं तर अवनीत आणि अभिषेक निगम एकत्र काम करण्याची ही पहिलीच वेळ असेल.

Tunisha sharma
Tunisha Sharma Death Case: "शिझानही आत्महत्या करु शकतो", वकिलाच्या दाव्याने खळबळ

तुनिशाच्या आत्महत्येनेनंतर सेटवर दहशतीचे वातावरण होते असा खुलासा काही अभिनेत्रीनीं केला होता. आता शोचा स्टुडिओ बदलण्यात आला आहे. रिपोर्ट्सनुसार, शोचा सेट बदलण्यात आला आहे. नवीन स्टुडिओमध्ये शोचे शूटिंग आधीच सुरू झाले आहे. आधी जुन्या सेटचे पूजन केले जाईल, त्यानंतरच त्या ठिकाणी शूटिंग होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com