Tunisha Sharma Death Case: शीजान खानला जामीन नाहीच..समोर आली मोठी अपडेट..Tunisha Sharma Death Case | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sheezan Khan

Tunisha Sharma Death Case: शीजान खानला जामीन नाहीच..समोर आली मोठी अपडेट..

Tunisha Sharma Death Case: टी.व्ही अभिनेत्री तुनिषा शर्मा आत्महत्या प्रकरणात पोलिसांनी तिचा बॉयफ्रेंड शीजान खानला अटक केली होती. सध्या शीजान खानला न्यायालयीन कोठडी सुनावली गेली आहे. शीजानवर तुनिषाला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप लावला गेला आहे.

७ जानेवारी,२०२३ रोजी शीजान खानच्या जामीनावर सुनावणी होणार होती. पण शीजान खानच्या अडचणी कमी होण्याचं चिन्ह दिसत नाहीय. कोर्टानं शीजान खानच्या जामीन याचीकेवर स्थगिती आणत आता ९ जानेवारी ही पुढील सुनावणीची तारीख दिली आहे.(Tunisha Sharma Death Case: Sheezan Khan Bail hearing postponed update)

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: बिनधास्त निकाल जाहीर करा..मेघा धाडेनं सांगून टाकली विज्येत्यासह रनरअपची नावं

कोर्टात शीजान खानच्या वकीलांनी सांगितले आहे की,'' शीजान निर्दोष आहे. पोलिसांच्या अकार्यक्षमतेचा फटका शीजान आणि त्यांच्या कुटुंबाला बसला आहे''.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: निकाला आधीच समोर आलं विनरचं नाव? स्मिता गोंदकरचा गौप्यस्फोट..

तुम्हाला थोडक्यात माहितीसाठी सांगतो की २४ डिसेंबर,२०२२ रोजी तुनिषा शर्मा या २० वर्षीय टी.व्ही अभिनेत्रीनं आपली मालिका 'अली बाबा..' च्या सेटवर आत्महत्या केली होती. या प्रकरणात तुनिषाच्या आईनं तुनिषाचा सहकलाकार शीजान खानला दोषी ठरवत आपल्या मुलीला आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याचा आरोप केला होता. पोलिसांनी या संबंधित केस दाखल करुन २५ डिसेंबर रोजी शीजान खानला अटक केली होती.

हेही वाचा: Bigg Boss Marathi 4: ना अपूर्वा..ना किरण माने..आयत्या वेळेला गेम पलटणार..काय म्हणाला उत्कर्ष शिंदे?

शीजान खानच्या वकीलांनी पुढे म्हटलं आहे की,''सत्याचा विजय होईल,आम्हाला न्यायव्यवस्थेवर पूर्ण भरोसा आहे. आणि शीजान खान निर्दोष आहे. पोलिस केवळ त्यांचे अपयश लपवण्यासाठी शीजान आणि त्याच्या कुटुंबाला त्रास देत आहेत. पोलिस आपल्या पावरचा चुकीचा वापर करत आहेत''.

हेही वाचा: Irrfan Khan: एकेकाळी इरफाननं शाहरुखशीही घेतला होता पंगा, भर पत्रकार परिषदेत म्हणाला होता..

मीडिया रिपोर्टनुसार समोर आलं आहे की शीजान आणि त्याच्या सीक्रेट गर्लफ्रेंडमधील चॅटला पोलिसांनी रिट्रीव्ह केलं आहे. चॅट वरनं समोर आलं आहे की शीजान एकावेळेस अनेक मुलींशी चॅट करायचा. तुनिषा सोबतच्या ब्रेकअपनंतर तिच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न शीजान खान करत होता हे देखील काही चॅटवरुन समोर आलं आहे. तुनिषा शीजानला सारखं मेसेज करायची आणि तो तिला इग्नोअर करायचा हे देखील त्या चॅटमुळे पोलिसांना कळालं आहे.

हेही वाचा: Pathaan: दीपिकाच्या 'भगव्या बिकिनी' वादावरनं रिना रॉय स्पष्टच बोलल्या.. म्हणाल्या,'आमच्या काळात..'

शीजान आता १४ दिवसांच्या न्यायालयीन कोठडीत आहे. शीजानला अटक झाल्यानंतर त्याच्या कुटुंबाने २ जानेवारी रोजी एक पत्रकार परिषद घेतली होती. ज्यामध्ये शीजानच्या सीक्रेट गर्लफ्रेंडच्या बातमीला त्याच्या कुटुंबानं खोटं म्हटलं होतं. तसंच,शीजान आणि तुनिषा यांनी एकमतानं ब्रेकअप केलं होतं आणि ते वेगळे झाले होते अशी माहिती शीजानची बहिण फलकने सोशल मीडियावर पोस्ट करत स्पष्ट केली होती.