Bigg Boss Marathi 4: ना अपूर्वा..ना किरण माने..आयत्या वेळेला गेम पलटणार..काय म्हणाला उत्कर्ष शिंदे?

उत्कर्ष शिंदेनं बिग बॉस सिझन ३ मध्ये चांगली टक्कर दिली होती. आता बिग बॉस सिझन ४ च्या विजेत्याविषयी बोलताना त्यानं त्याचं ठाम मत व्यक्त केलं आहे.
Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinion
Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinionEsakal

Bigg Boss Marathi 4: बघता बघता बिग बॉस ४ चं पर्व आता हळूहळू शेवटाकडे प्रवास करत आहे. आता घरात आहेत टॉप ५.अमृता धोंगडे,किरण माने,अक्षय केळकर,अपूर्वा नेमळेकर आणि राखी सावंत. उद्या रविवारी पार पडतोय या सिझनचा फिनाले.

गेल्या अनेक दिवसांपासून ज्या क्षणाची वाट सगळे पाहत होते तो दिवस आता येतोय, त्यामुळे अर्थातच घरातील स्पर्धकांच्याच नाही तर त्यांना पाठिंबा देणाऱ्या प्रेक्षकांच्या मनातील धाकधूकही वाढलेली आहे. (Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opninon)

Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinion
Bigg Boss Marathi 4: बिनधास्त निकाल जाहीर करा..मेघा धाडेनं सांगून टाकली विज्येत्यासह रनरअपची नावं

आता अंदाज लावले जातायत कोण असणार टॉप ३, कोण असणार टॉप २ आणि कोण ठरणार विजेता...यादरम्यान बिग बॉस सिझन ३ फेम उत्कर्ष शिंदेन सांगितलं आपलं मत... त्याच्या मते कोण होईल विनर?

Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinion
Bigg Boss Marathi 4: निकाला आधीच समोर आलं विनरचं नाव? स्मिता गोंदकरचा गौप्यस्फोट..

टॉप 5 ही नावं समोर आल्यावर आता टॉप 3 मध्ये कोण जाणार यासंदर्भात उत्कर्षला विचारले तर त्याने अपूर्वा नेमळेकर, अमृता धोंगडे आणि राखी सावंत ही तीन नावं सांगितली. गेल्या आठवड्यात उत्कर्ष शिंदे बिग बॉसच्या घरात जाऊन सदस्यांना भेटला आणि काही टास्क खेळला .आणि या टॉप 3 मध्ये राखी सावंत विनर व्हावी असं त्याचं मत आहे.

Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinion
Irrfan Khan: एकेकाळी इरफाननं शाहरुखशीही घेतला होता पंगा, भर पत्रकार परिषदेत म्हणाला होता..

राखी सावंत का विनर व्हावी? यासंदर्भात त्याला विचारले असता त्याने स्पष्ट सांगितलं " बिग बॉसच्या घरात जेव्हा आपण एक सदस्य म्हणून जातो तेव्हा तिथे खेळ खेळणे महत्वाच आणि प्रेक्षकांच्या नजरेत राहण हे गरजेचं आहे, आणि राखी सावंतने बिग बॉसच्या घरात येताच प्रेक्षकांच्या मनात जागा केली ' अंड्याची भुर्जी आणि राखी सावंतची मर्जी ' या घरात चालणार हे राखीने पहिल्या दिवसापासून दाखवले.

Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinion
Bigg Boss Marathi 4: अपूर्वाला विजयी करा! फॅन्सने मुंबईभरात झळकवलेत बॅनर..

''बिग बॉसच्या घरात राखीने आतपर्यंत काही ना काही करून प्रेक्षकांच मनोरंजन केले आहे.मग ते पाणी फेक असो , अंडी फोडणे असो पीठ फेकणे असो किंवा चेहऱ्यावर रंग रंगोटी करून मॉनजोलिका बनणे असो.. हे सगळं करून तिनं बिग बॉसच सुस्तावलेलं घर जाग केलं आहे''.

Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinion
Bigg Boss Marathi 4: पब्लिकच्या फोनवर फिरतोय सातारच्या बच्चनचा भावूक मेसेज..किरण माने म्हणाले,'जमेल तसं..'

जेव्हापासून राखी सावंत बिग बॉसच्या घरात आली आहे ति आपले अनुभव सगळ्यांना सांगताना दिसते, इतकेच नव्हे तर सगळ्यांना जाग पण करते... ती अनेक वेळा बोलली आहे, 'मी तुम्हाला जाग करायला आली आहे'.

Bigg Boss Marathi 4 Winner, Utkarsha shinde opinion
Bigg Boss Marathi 4: घडू नये ते घडलं आणि अपूर्वाने भल्याभल्यांची जिरवली.. हा किस्सा..

बिग बॉसच्या घरात गेम फक्त टाक्सवेळी खेळायचे नसतात तर २४ तास कसं आपण प्रेक्षकांचे मनोरंजन करू हे पण महत्वाचं आहे. हे बिग बॉसचं घर आहे जितका तमाशा तितकीच पब्लिक खुश.शेवटी प्रेक्षकांना कोणता मनोरंजनाचा मसाला पाहिजे हे राखीला माहिती आहे भले राखी सावंत वाईल्ड कार्ड एंट्री म्हणून आली आहे पण जर ती विनर झाली तर बिग बॉसच्या घरात वाईल्ड कार्ड एंट्री करणाऱ्या सदस्यांची एक वेगळीच छाप पडेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com