Urfi Javed: ऐकेल ती उर्फी कसली! चित्रा वाघ यांच्यासाठी उर्फीची नवी फॅशन.. | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Urfi Javed

Urfi Javed: ऐकेल ती उर्फी कसली! चित्रा वाघ यांच्यासाठी उर्फीची नवी फॅशन..

आज काल सर्वत्र उर्फी जावेदची चर्चा सुरु आहे. सध्या उर्फी आणि भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यातील शीत यूद्ध सर्वांनाच माहित आहे. त्यातच उर्फी आता ट्विट करत चित्रा वाघ यांना डिवचतं आहे. चित्रा वाघ यांनी तिला जेलमध्ये टाकण्याची मागणी केली आहे. इतकच नाही तर ती दिसल्याचं तिला मारण्याचीही धमकी दिली.

मात्र उर्फीही काही कमी नाही तिने ट्विटच्या माध्यमातुन चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला. त्यामुळं प्रकरणं अजूनचं चिघळणार असं दिसतंय. त्यातच आता उर्फीनं तिच्या नवीन फॅशनचा अविष्कार दाखवला आहे. तिच्या कपड्यामुळे तिच्यावर टिका करणाऱ्या लोकांकडे तिने पुन्हा दुर्लक्ष केलयं.

हेही वाचा: Urfi Javed Tweet: 'चित्राजी संजय आठवतो का?' उर्फीनं चित्रा वाघ यांची कुंडलीच काढली

उर्फी जावेदने तिचा नवा व्हिडिओ त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवर अपलोड केला आणि त्याचा फोटोही ट्विटरवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये उर्फीने पुन्हा आपला नवीन पराक्रम दाखवला आहे. उर्फीच्या या व्हिडिओमध्ये तिने गोल रिंगचा वापर करुन विचित्र ड्रेस तयार केलाय आणि तो परिधान केलेला दिसतो.

तिचा हा ड्रेस पांढऱ्या रंगाच्या रिंगने बनलेला आहे. दुसरीकडे, उर्फीने तिने शरीराचा काही भाग दोन मोठ्या फुलांनी झाकलेला आहे. या ड्रेससोबत तिने गडद लाल लिपस्टिक लावली आहे आणि केसांची लांब वेणी बनवली आहे.

हेही वाचा: Urfi Javed: खुद्द वडिलांनी २ वर्षे केला शारीरिक व मानसिक छळ' अशी आहे उर्फीची कहाणी..

हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. तिच्या व्हिडिओवर कमेंट करून यूजर्स तिला ट्रोल करत आहेत. तर काही तिच्या फॅशनचं कौतुक करत आहेत. यावरुन एक मात्र लक्षात येत की कोणी कितीही तिच्या विरुद्ध कारावाई केली तरी ती कुणाचं ऐकणार नाही. ती तिच्या अतरंगी फॅशनचा अविष्कार करतच राहणार आहे.