Tunisha Sharma: तुनिषा अनंतात विलीन... मामांनी दिला मुखाग्नी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Tunisha Sharma

Tunisha Sharma: तुनिषा अनंतात विलीन... मामांनी दिला मुखाग्नी

टीव्ही अभिनेत्री तुनिषा शर्मानं वयाच्या २०व्या वर्षी मालिकेच्या सेटवर आत्महत्या केली. आज तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. तुनिषाला पाणावलेल्या डोळ्यांनी तिला निरोप दिला. तुनिषाच्या मामांनी तिला मुखाग्नी दिला.

हेही वाचा: Tunisha Sharma Death: तुनिषाचं पार्थिव पाहिलं आईला चक्कर आली, शोक आवरेना!

तुनिषाने 24 डिसेंबर 2022 रोजी आत्महत्या केली होती तर तिच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात आले. गोडदेव स्मशानभूमीत मामांनीच तुनिषाचे अंत्यसंस्कार केले.

हेही वाचा: Tunisha Sharma: ' हा मूर्खपणा...तुनिषाच्या मृत्यूला तिचं कुटुंबच जबाबदार...' शक्तीमान भडकला

हेही वाचा: Tunisha Sharma Death Case : तुनिशाच्या अंत्यसंस्कारासाठी पोहचली शिझानची आई अन् बहिण, पाहा Video

तुनिषा आत्महत्या प्रकरणाचा पोलिसांनी वेगानं तपास सुरु केला असून त्यांना यासंबंधी अनेक धक्कादायक गोष्टी समोर आल्या आहेत. तुनिषाच्या आईनं देखील काही खुलासे केले असून त्यामध्ये शेवटपर्यत तुनिषा आपल्याला काही करुन शिझानशी लग्न करायचं आहे, असे सांगत होती. त्यांच्यात गेल्या काही दिवसांपासून आलबेल नव्हते. त्यामुळे ती नैराश्यात असल्याचे म्हटले होते.