esakal | चंकी पांडे यांना मातृशोक; अनन्याला अश्रू
sakal

बोलून बातमी शोधा

nanya panday ,snehlata,chunky

चंकी पांडे यांना मातृशोक; अनन्याला अश्रू अनावर

sakal_logo
By
प्रियांका कुलकर्णी

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडे (chunky panday) यांची आई स्नेहलता पांडे (snehlata pandey) यांचं निधन झालं. त्या 85 वर्षाच्या होत्या. मुंबईमधील वांद्रे येथील राहत्या घरी शनिवारी (१० जुलै) त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. चंकी यांची मुलगी अनन्या (ananya panday) ही आजीला शेवटचा निरोप देताना भावूक झाली. स्नेहलता पांडे यांच्या निधनाबद्दल कळाल्यानंतर चंकी पांडे आणि भावना पांडे हे दोघेही त्यांच्या वांद्रे येथील घरी पोहोचले. तसेच चित्रपट निर्माते साजिद खान, समीर सोनी, नीलम, सोहेल खानचा मुलगा निरवाण खान आणि इतर काही कलाकार स्नेहलता यांच्या वांद्रेतील निवासस्थानी पोहोचले.(ananya panday grandmother snehlata pandey passes away chunky performs last rites)

हेही वाचा: 6 years for Baahubali: 'या' कारणांमुळे सुपरहिट ठरला 'बाहुबली'

अनन्या तिच्या आजीच्या सोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करते. चंकी पांडे यांनी देखील 'मदर डे' निमीत्ता त्यांच्या आईचा फोटो शेअर केला होता. अनन्या पांडेनं आजीचा (स्नेहलता) वाढदिवस साजरा करतानाचा एक व्हिडीओ इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला होता. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘माझ्या तरुण आजीला वाढदिवसाच्या शुभेच्छा असं म्हटलं होतं’ या आशयाचे कॅप्शन दिले होतं. अनन्याने 'जावानी' या गाणावरील आजींसोबतचा डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला होता.

हेही वाचा: राधिका म्हणाली, 'घरी बसावं लागलं तरी चालेल पण सर्जरी करणार नाही'

loading image