Devoleena Bhattacharjee: लग्नाआधी राहीली गरोदर म्हणून केलं गुपचूप लग्न? दिलं स्पष्टीकरण... | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Devoleena Bhattacharjee

Devoleena Bhattacharjee: लग्नाआधी राहीली गरोदर म्हणून केलं गुपचूप लग्न? दिलं स्पष्टीकरण...

छोट्या पडद्यावरील लोकप्रिय मालिका साथ निभाना साथिया यातून गोपी बहूची भूमिका साकारुन घरघरात पोहचलेली दवोलिना भट्टाचार्जी गेल्या काही दिवसांपासून तिच्या लग्नामूळं चर्चेत आहे. तिने तिच्या प्रियकरासोबत अचानक लग्नाची घोषणा केली आणि तिने जीम ट्रेनर शहनवाज शेख याच्यासोबत लग्नगाठ बांधली. यानंतर सोशल मीडियावर तिला खूप ट्रोलही करण्यात आलं.

हेही वाचा: Anil Kapoor Birthday अन् अनिल कपूरची पत्नी एकटीच हनीमूनला...काय आहे तो किस्सा...

असं काय कारणं होतं की तिने अगदी साध्या पद्धतीने आणि गुपचूप लग्न केलं असाही सवाल तिचे चाहते तिला विचारत होते. इतकच नाही तर कोहींनी तिची आलिया भट्टशी तुलनाही केली. ज्यात असा दावा करण्यात येत होता की तिने घाईघाईत लग्न केले कारण गर्भवती आहे. त्याच बरोबर अनेक अफवा सोशल मिडियावर वाऱ्यासारख्या पसरल्या होत्या. आता या अखेर देवोलिनानेच यासर्व प्रश्नाची उत्तर देत ट्रोलर्सचं तोंड बंद केलयं.

हेही वाचा : Love Jihad: प्रेमाला धर्म आहे...?

हेही वाचा: Jhoome Jo Pathaan: चोरटा पठाण! कार्टून फिल्मचं गाणं शाहरुखनं चोरलं...

या अभिनेत्रीने सर्व ट्रोलला सडेतोड उत्तर दिले आहे. ई-टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तिने यावर मोकळेपणाने तिचं मात मांडल. देवोलिना म्हणते, "मला कोणालाच काहीही स्पष्टीकरण देण्याची गरज नाही, पण आजूबाजूला असे लोक आहेत ज्यांना वाटते की मी प्रेग्नंट आहे आणि म्हणूनच मी अचानक लग्न केलं. एखाद्याला त्रास देण्याची एकही संधी तुम्ही सोडू शकत नाही ही वेगळ्याच पातळीवरची हिपोक्रेसी आहे "

पुढे ती देवोलीना म्हणाली, "ही लोक कोणालाच आनंदी पाहू शकत नाही आणि हे कधीकधी निराशाजनक असतं. कुणाला कुणाच्या आयुष्यात इतकं लक्ष देण्याची काय गरज आहे? पण नंतर मी या कमेंट्सवर हसले आणि हा विषय सोडून दिला. मला खरंच माहित नाही की पुढे काय होणार आहे."