esakal | धक्कादायक! 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या
sakal

बोलून बातमी शोधा

preksha mehta1

लॉकडाऊनमुळे हाती काम नसल्याने ती नैराश्यात गेलेल्या छोट्या पड्यावरील क्राईम पेट्रोल मालिकेतील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

धक्कादायक! 'क्राईम पेट्रोल' फेम अभिनेत्रीची गळफास घेऊन आत्महत्या

sakal_logo
By
सकाळन्यूजनेटवर्क

मुंबई : लॉकडाऊनमुळे हाती काम नसल्याने ती नैराश्यात गेलेल्या छोट्या पड्यावरील क्राईम पेट्रोल मालिकेतील अभिनेत्री प्रेक्षा मेहताने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सोमवारी रात्री इंदोर येथील राहत्या घरी तिने गळफास घेतला. ती 25 वर्षांची होती. आत्महत्या करण्याआधी तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली होती. 

मोठी बातमी ः विमानसेवा सुरु झाली अन् अनेकांनी मुंबई सोडण्याचा निर्णय घेतला...

टीव्ही अभिनेत्री प्रेक्षा मेहता लॉकडाऊन सुरू होण्यापूर्वी इंदोरला गेली होती. घरी राहून लॉकडाऊन दरम्यान तिच्याकडे कोणतेही नसल्याने तिला बेरोजगारीची चिंता होती आणि त्यामुळे ती नैरश्यामध्ये गेली होती. तिच्या आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही पण कुटुंबांनी दिलेल्या माहितीनुसार प्रेक्षा अनेक दिवसांपासून तणावात असल्याचे समोर आले आहे आणि याच कारणाने इंदोरमधील बजरंग नगर येथील तिच्या राहत्या घरी तिने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. पोलिस या प्रकरणी चौकशी करत आहेत. 

मोठी बातमी ः सरकारच्या निर्णयावर डॉक्टरांनी व्यक्त केली नाराजी; निर्णय आहे तरी काय?

तिच्या वडिलांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार सोमवारी रात्री प्रेक्षा तिच्या खोलीत गेली आणि काही वेळ तिने तिचा फोन वापरला. यादरम्यान तिने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक स्टोरी देखील पोस्ट केली होती. ज्यामध्ये लिहिले आहे की, 'सर्वात वाईट असतं ते म्हणजे स्वप्न मरून जाणं.' त्यानंतर तिने पंख्याला लटकून गळफास घेतला. सकाळी वडिलांनी तिच्या खोलीत जाऊन पाहिले तर प्रेक्षाने आत्महत्या केली होती. त्यानंतर तिला रुग्णालयात नेण्यात आले परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. 

मोठी बातमी ः हजारो लालपरींची निस्वार्थ सेवा; तब्बल 4 लाख मजुरांना घडवला प्रवास

प्रेक्षाने तिच्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात नाटकांपासून केली होती. याशिवाय तिने 'क्राईम पेट्रोल' मालिकेच्या बऱ्याचशा भागात काम केले आहे. 'क्राईम पेट्रोल' शिवाय ती मेरी दुर्गा, लाल इश्क सारख्या मालिकांमध्ये तिने काम केले आहे. अक्षय कुमारच्या पॅडमॅन चित्रपट देखील तिने काम केले आहे.

loading image