esakal | हजारो लालपरींची निस्वार्थ सेवा; तब्बल 4 लाख मजुरांना घडवला प्रवास
sakal

बोलून बातमी शोधा

st

कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे लाखो कामगार राज्यात अडकले आहे. गेल्या दोन महिने या मजुरांनी आपल्याजवळ होत नव्हते ते सगळे पणाला लावून जगले मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव बघता मजूर आपल्या राज्यात पायी निघाले होते.

हजारो लालपरींची निस्वार्थ सेवा; तब्बल 4 लाख मजुरांना घडवला प्रवास

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

मुंबई : कोरोनामुळे झालेल्या लॉकडाऊन मुळे लाखो कामगार राज्यात अडकले आहे. गेल्या दोन महिने या मजुरांनी आपल्याजवळ होत नव्हते ते सगळे पणाला लावून जगले मात्र, कोरोनाचा वाढता प्रभाव बघता मजूर आपल्या राज्यात पायी निघाले होते. या मजुरांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर मोफत पोहचवण्याचे काम एसटी महामंडळ करत आहे. 9 मे पासून 36 हजार 432 बसेसच्या माध्यमातून सुमारे 4 लाख 33 हजार 509 प्रवाशांना आतापर्यंत त्यांच्या राज्याच्या सीमेवर सोडण्यात आले आहे.

मोठी बातमी ः पावसाळ्याचे वेध लागले हो..! कर्नाळा अभयारण्यात तिबोटी खंड्याचे घडले दर्शन...

स्थलांतरित मजुर आणि कामगारांच्या मदतीला राज्यात एसटी धावून आली आहे. 9 मे पासून आतापर्यंत 4 लाख 33 हजार 509 स्थलांतरित मजुरांना त्यांच्या राज्यात जाण्यासाठी महाराष्ट्राच्या सीमेपर्यंत बसची सोय उपलब्ध करून देण्यात आली आहे. मध्यप्रदेश, तेलंगणा, गुजरात, छत्तीसगड, कर्नाटक यासारख्या राज्यांच्या सीमेपर्यंत धावून स्थलांतरित कामगारांना त्यांच्या घरी जाण्यास मदत केली आहे.

मोठी बातमी ः कामगार गावाला गेल्याने कारखानदार चिंतेत; वसईतील कारखान्यांमध्ये कामगारांचा तुटवडा

लॉकडाऊनमध्ये सेवा सुरुच राहणार
यातील काही स्थलांतरीत मजुरांनी पुढच्या प्रवासासाठी श्रमिक रेल्वे सेवेचा ही लाभ घेतला आहे. महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसच्या माध्यमातून जसे इतर राज्यातील स्थलांतरीत मजुर आणि कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेपर्यंत पोहोचवले जात आहे तसेच इतर राज्यात अडकलेल्या महाराष्ट्रातील लोकांना राज्यात आणण्याचे काम सुद्धा महामंडळाने केले आहे. संपूर्ण लॉकडाऊन काळात ही सेव सुरूच राहणार असल्याचे एसटी महामंडळाने सांगितले आहे.

loading image