
अगोदर अश्लील कमेंट केली, नंतर थेट ताईच म्हणाला....
मुंबई - बॉलीवूडची अभिनेत्री असो वा टेलिव्हिजन क्षेत्रातील त्याचं फोटोशुट चाहत्यांसाठी एक वेगळी पर्वणी असते. अनेक अभिनेत्री बोल्ड फोटोशुट (Bold Photoshoot) करुन चाहत्यांचे लक्ष वेधून घेत असतात. आता अभिनेत्री आणि मॉडेल टीना दत्ता (Tina Dutta)चर्चेत आली आहे. तिनं एक फोटोशुट केले आहे. त्या हॉट फोटोशुटला सोशल मीडियावर (social media) जोरदार प्रतिसाद मिळताना दिसत आहे. अशावेळी एका युझर्सनं तिला अश्लील कमेंट दिली होती. त्यावर टीनानं तिला चांगलेच सुनावले आहे. (tina dutta gave slams troller for commenting glamrous photos user said sorry)
खतरो के खिलाडीमध्ये (khatro ke khiladi) दिसलेली टीना दत्तानं तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरुन काही फोटो शेअर केले होते. त्याला तिच्या चाहत्यांचा मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. टीनाचे ते फोटो टॉपलेस होते. तिचा तो हॉट अंदाज चाहत्यांना आवडला. त्यामुळे त्यांनी तिला कमेंट देण्यास सुरुवात केली होती. मात्र त्यात एका युझर्सच्या कमेंटनं टीनाला राग आला आहे. तिनं त्याची तक्रार सायबर विभागाकडे केली आहे. तसेच त्याला खडे बोलही सुनावले आहे.

tina dutta news
हेही वाचा: The Family Man 2 Review: मनोज वाजपेयीच्या तोडीस तोड समंथाची कामगिरी
हेही वाचा: Good News: अपारशक्ती खुराना लवकरच होणार बाबा
टीनानं त्या युझर्सची चांगलीच खरडपट्टी काढली आहे. त्यानं तिला लिहिलं आहे की, मी आपल्या बद्गल जे काही बोललो त्याबद्दल आपली माफी मागतो. त्यावर टीनानं लिहिलं आहे की, मी अचानक तुझी ताई कशी झाले, त्यानंतर टीनानं तिचं अकाऊंट डीअॅक्टिव्हेट केलं आहे. त्या युझर्सनं दिलेल्या कमेंटचा स्क्रिनशॉट तिनं सोशल मीडियावर शेअर केला होता. तो स्क्रिनशॉट टीनानं सायबर विभागालाही टॅग केले आहेत.
Web Title: Tina Dutta Gave Slams Troller For Commenting Glamrous Photos User Said
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..