दोन मुलांची आई असलेली 'ही' अभिनेत्री चक्क तिसऱ्यांदा प्रेमात !

वृत्तसंस्था
मंगळवार, 7 जानेवारी 2020

'कसौटी जिंदगी की' या मालिकेतील अभिनेत्रीने पुन्हा एकदा प्रेमात असल्याचा खुलासा केला आहे. जाणून घ्या कोण आहे ती व्यक्ती ?

मुंबई : बॉलिवूडमधील कलाकारांची खऱ्या आयुष्यातही अनेकदा चित्रपटासारखीच स्टोरी असते. विशेष म्हणजे लव्ह स्टोरी आणि ब्रेकअपचा सिलसिला कायम असतोच. 'कसौटी जिंदगी की' या मालिकेने प्रेक्षकांच्या मनावर घर केले. त्यामधील अभिनेत्री श्वेता तिवारीची ओळख घराघरात पोहोचली. श्वेता तिच्या वैवाहिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत राहिली. श्वेता पुन्हा एकदा प्रेमात पडली आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Wandering Alone is Fun!

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

वाचा : #JNUAttack : 'लिडर हवा तर असा' सोनमने केलं आदित्य ठाकरेंचं कौतुक

श्वेता तिवारीचं वैवाहिक आयुष्य नेहमीच चर्चेचा विषय ठरला आहे. श्वेताने दोन लग्नं केली मात्र दुर्देवाने दोन्हीही अपयशी ठरली. असं असलं तरी मात्र श्वेताने कधीच हार मानली नाही. खंबीरपणे ती एकटी दोन्ही मुलांचा सांभाळ करीत आहे. श्वेता नक्कीच एक प्राऊड सिंगर पेरेंट आहे. तिला एक पलक आणि रेयांश ही दोन मुलं आहेत. पण, पुन्हा एकदा श्वेता प्रेमात असल्याचं तिनं कबुल केलं आहे. यावेळी मात्र ती व्यक्ती कोण आहे याची उत्सुकता चाहत्यांमध्ये होती. 

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

Mera #nanhayatri

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on

एका मुलाखती दरम्यान सध्या ती कोणाच्या प्रेमात आहे असा सवाल श्वेताला करण्यात आला. त्यावर श्वेता म्हणाली,' माझ्या मुलांवर माझा खूप जीव आहे सुरुवातीपासूनच मी त्यांच्या प्रेमात आहे. आताही माझं त्यांच्यावर जीवापाड प्रेम आहे आणि दुसऱ्या कोणी व्यक्तीसाठी मला वेळ नाही. इतर कोण्या व्यक्तीची आता मला गरज भासत नाही आणि माझ्या दोन मुलांसोबत मी खूप आनंदी आहे.

वाचा : HappyBirthdayBipasha : चार ब्रेकअपनंतर बिपाशाला मिळालं खरं प्रेम 

श्वेता सोशल मीडियावर अॅक्टीव असते आणि तिच्या मुलांसोबत अनेकदा गोड फोटो शेअर करत असते. श्वेताने अभिनेता राजा चौधरीशी लग्न केलं पण, 2007 मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर श्वेताने अभिनव कोहलीशी लग्न केलं पण हे नातंही फार काळ टिकू शकलं नाही. 'बिग बॉस सिझन 4' ची श्वेता विजेती ठरली होती. सध्या  ‘हम तुम और देम’ ही वेब सीरिजमध्ये काम करत आहे.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

 #nanhayatri @palaktiwarii

A post shared by Shweta Tiwari (@shweta.tiwari) on


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tv actress shweta tiwari again in love for the third time