esakal | चीनी अॅप्लिकेशन बंदीचे टीव्ही कलाकारांनी केले स्वागत
sakal

बोलून बातमी शोधा

चीनी अॅप्लिकेशन बंदीचे टीव्ही कलाकारांनी केले स्वागत

सर्वसामान्यांसह सेलिब्रेटींचाही समावेश आहे. या अॅप्सवर बंदी घालण्याबाबत सरकारने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये 59 अॅप्सची यादी देण्यात आली आहे.

चीनी अॅप्लिकेशन बंदीचे टीव्ही कलाकारांनी केले स्वागत

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

मुंबई ः भारत सरकारने चिनी-मोबाइल अॅप्लिकेशन्सवर बंदी आणण्याची घोषणा केली  ज्यात टिकटाॅक, कॅमस्केनर, शेअरइट, ब्युटी प्लस, यूसी ब्राउझर असे अनेक अॅप्स आहेत. ही घोषणा होताच अनेक भारतीयांनी सोशल मीडियावर आनंद व्यक्त केला आणि या निर्णयाचे कौतुक केले. यामध्ये सर्वसामान्यांसह सेलिब्रेटींचाही समावेश आहे. या अॅप्सवर बंदी घालण्याबाबत सरकारने एक निवेदन जारी केले ज्यामध्ये 59 अॅप्सची यादी देण्यात आली आहे.

वेब सीरिज बघताय जरा सावध व्हा, नाहीतर तर होऊ शकतं हे...

याबाबत  नागीन 4  या मालिकेतील अभिनेत्री निया शर्मा हिने "आमचा देश वाचविल्याबद्दल धन्यवाद. टिक टाॅक नावाच्या या व्हायरसला पुन्हा कधीही परवानगी देऊ नये!" असं ट्विट करून या निर्णयावर प्रतिक्रिया व्यक्त केली.  तर कुशल टंडन यांनी "अंततः" असे ट्विट करून या निर्णयाचे स्वागत केले.
करणवीर बोहरा यांनीही चिनी अॅप्सवर बंदी आणल्याबद्दलच्या प्रतिक्रियेवर एक व्हिडिओ शेअर केला आणि लिहिले की, "आमच्या सरकारने घेतलेल्या या निर्णयाबद्द्ल आनंदी .... मी तर म्हणेन ही एक चांगली सुरुवात आहे. #DELETE #ChinnAppsBlocked ".टीव्ही कलाकारांनी सरकारच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. हे अॅप वापरणारे त्याची काही गैरवापर करीत होते. याबाबतच्या अनेक तक्रारी आल्या होत्या. त्यामुळे यावर आता बंदी घालण्यात आली आहे.