Bigg Boss Marathi 4: 'माझ्यातला शाकाल जागवलाय तु्म्ही..; अपूर्वा भडकली

Big Boss
Big BossEsakal

Bigg Boss Marathi 4: छोट्या पडद्यावरील सर्वात लोकप्रिय शो बिग बॉस हा सध्या चांगलाच रंगात आला आहे. हिंदीसोबतच मराठी बिग बॉसचीही चांगलिचं हवा आहे. यातील राडे काही संपल्याचं दिसतं नाहीये. बिग बॉस मराठीच्या घरामधून बाहेर जाण्याच्या प्रक्रियेत कोण कोणते सदस्य नॉमिनेट होणार याचा उलगडा आजच्या भागात होणार आहे. मात्र त्यापुर्वीचं घरात चांगला राडा झाल्याचं दिसतंय. अपूर्वाच्या अंगात शाकाल आल्याचं दिसतंय...

नूकतचं शोच्या निर्मात्यांनी एक प्रोमो सोशल मिडियावर पोस्ट केला आहे. या व्हिडिओत अक्षय, रोहित, अमृता,वरच्या माळावर बसलेले दिसत आहे. त्यात अक्षयचं आणि अपूर्वाचं चांगलंचं वाजल्याचं दिसतंय.

हेही वाचा: Gautami Patil- लावणीचा बाजच अश्लीलतेचा?

अपुर्वा फुल डॉनगिरी करत धमक्या देतांना दिसतेय. अक्षय तिला बोलतोय की, ‘आम्हीपण नांटक बघितली आहे. त्यावर अपुर्वा तिचं संतूलन गमावते आणि म्हणते, ‘ उभ राहण्याचे वांदे केले तर नाव अपुर्वा नेमळेकर लावत नाही मी, माझ्यातला शाकाल जागावलाय तुम्ही.... प्रेमाची, बुद्धिची, पोटाची मारते की नाही बघाचं..उद्या टॉयलेटला रांग लागली पाहिजे...’असं आव्हानचं ती त्या चारही जणांना देतांना दिसतेय.

आता अमृता इतकी का भडकली आणि ती असं काय करणार आहे की टॉयलेटला रांग लागेल? हे तर शो पाहिल्यानंतर समजेलचं. ती नेहमीच शोमध्ये राडा करत असते. प्रेक्षकांच यामाध्यमातून चांगलचं मनोरंजन होणार आहे. प्रेक्षकांना प्रसाद आणि अपुर्वा एका टिममध्ये असल्याचं नवलं वाटतय. तर काहींनी या व्हिडिओवर भन्नाट अशा कमेंटही केल्या आहेत.

पुढे काय झाले जाणून घेण्यासाठी बघत राहा बिग बॉस मराठी सोम ते शुक्र रात्री १० वा. आणि शनि - रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठी वाहिनीवर आणि कधीही VOOT वर.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com