नेहा-काजलनंतर आता गौहर खानच्या घरी वाजणार सनई चौघडे, जैदसोबत पार पडला साखरपुडा

दिपाली राणे-म्हात्रे, टीम ई सकाळ
Thursday, 5 November 2020

गौहरने संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारसोबत असलेल्या नात्यावर आत्तापर्यंत मौन बाळगलं होतं. मात्र नुकतंच तिने जैदसोबतच्या नात्याची कबुली दिली असून दोघांचा साखरपुडा देखील पार पडला असल्याचं जाहीर केलं आहे. 

मुंबई- 'बिग बॉस ७' ची विजेती गौहर खान सध्या तिच्या खाजगी आयुष्यातील घडामोडींमुळे चर्चेत आहे. गौहर खानच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. नेहा कक्कर, काजल अग्रवालनंतर आता गौहर खानच्या घरी सनई चौघडे वाजणार आहेत. सोशल मिडियावर नेहमीच ऍक्टीव्ह असणा-या गौहरने संगीतकार इस्माईल दरबार यांचा मुलगा जैद दरबारसोबत असलेल्या नात्यावर आत्तापर्यंत मौन बाळगलं होतं. मात्र नुकतंच तिने जैदसोबतच्या नात्याची कबुली दिली असून दोघांचा साखरपुडा देखील पार पडला असल्याचं जाहीर केलं आहे. 

व्हिडिओ: जेव्हा शाहरुखने ऐश्वर्यावर केलेला प्रश्नांचा भडिमार, ऐश्वर्याने दिली अशी उत्तरं..  

गौहर खानने तिच्या इंस्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये ती आणि जैद दरबार एकमेकांकडे पाहताना दिसतायेत. सोबतंच त्यांच्या आजुबाजुला फुगे आणि इतर सजावट दिसून येतेय. यापैकी एका फुग्यावर 'ती हो म्हणाली' असं लिहिलंय. हा फोटो शेअर करताना गौहरने कॅप्शनमध्ये जैदला टॅग करत अंगठीचा इमोजी देखील टाकला आहे. गौहर खानच्या या पोस्टवर अनेक सेलिब्रिटींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. नेहा कक्कर, जय भानुशाली, सुनील ग्रोवर आणि अनेक कलाकार गौहरच्या या फोटोवर कमेंट करत तिच्या साखरपुड्याच्या शुभेच्छा देत आहेत.

 
 
 
 

 
 
 
 
 
 
 
 
 

@zaid_darbar

A post shared by GAUAHAR KHAN (@gauaharkhan) on

असं म्हटलं जात आहे की गौहर आणि जैद २५ डिसेंबरला लग्न करणार आहेत. रिपोर्ट्सनुसार२२ डिसेंबरला सुरु करुन लग्नाचे विधी ३ दिवस चालतील ज्यामध्ये केवळ कुटुंबिय आणि खास मित्रमैत्रीणींचा समावेश असेल. नुकतंच 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर आल्यानंतर गौहर आणि जैद सुट्टी एन्जॉय करण्यासाठी गोव्याला गेले होते. असं म्हटलं जातंय की दोघेही गोव्यात प्री-वेडिंग शूटसाठी गेले होते.   

tv bigg boss 7 winner gauahar khan and zaid darbar are engaged  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: tv bigg boss 7 winner gauahar khan and zaid darbar are engaged