Bigg Boss 15 Winner: तेजस्वी प्रकाश जिंकली, प्रतिक सहेजपाल उपविजेता

तेजस्वीच्या नावाची पहिल्यापासून प्रेक्षकांमध्ये चर्चा सुरु होती.
Tejasswi Prakash Is The Winner Of Bigg Boss 15
Tejasswi Prakash Is The Winner Of Bigg Boss 15

Bigg Boss 15 Winner: टीव्ही मनोरंजन (Tv Entertainment) क्षेत्रातील सर्वाधिक लोकप्रिय असणारा शो म्हणून बिग बॉसकडे (Bigg Boss 15) पाहिले जाते. आज या रियॅलिटी शो ची सांगता झाली आहे. बिग बॉसच्या 15 व्या सीझनचे विजेतपद तेजस्वीने मिळवले आहे. तिच्या विजयाची शाश्वती त्याच्या चाहत्यांना होती. गेल्या काही दिवसांत तिनं आपल्या परफॉर्मन्सनं चाहत्यांना जिंकून घेतले होते. मात्र सरतेशेवटी तिला यश मिळाले आहे. बिग बॉसचा सुत्रसंचालक सलमान खाननं यंदाच्या सीझनच्या विजेत्याचं नाव जाहीर केलं आहे. रविवारी सायंकाळी सुरुवात झालेल्या ग्रँड फिनालेमध्ये (Grand finale) गतविजेत्या स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये शहनाज गिल, रश्मी देसाई, राखी सावंत, यांचा सहभाग होता. (Tejasswi Prakash Is The Winner Of Bigg Boss 15)

टेलिव्हिजनवर सर्वाधिक पाहिला जाणारा शो म्हणून बिग बॉसची ओळख आहे. आतापर्यत या शोचे 14 सीझन झाले आहे. यावेळच्या 15 व्या सीझनला देखील चाहत्यांची मोठी पसंती मिळाली आहे. त्यामध्ये सुरुवातीच्या काळात टीआरपीच्या अडचणीमुळे यंदाचा सीझन लवकर संपवण्याची चर्चा सुरु होती. मात्र तसे काही झाले नाही. सलमाननं वाईल्ड कार्डव्दारे काही स्पर्धकांची इंट्री केल्याचे दिसून आले. त्यात राखी सावंत आणि अभिजित बिचुकले यांचा समावेश होता. मात्र काही दिवसांपूर्वी सलमान आणि बिचुकले यांच्यातील वाद सर्वांसमोर आला. बिचुकलेनं सलमानवर गंभीर आरोप करुन लक्ष वेधून घेण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यात त्याला फारसे यश आले नाही. शेवटी तेजस्वी प्रकाश (Tejasswi prakash) आणि प्रतिक सहजपाल (Pratik Sahejpal) यांच्यात जोरदार चुरस दिसून आली. (Bigg Boss 15 Winner)

Tejasswi Prakash Is The Winner Of Bigg Boss 15
Victoria Marathi Movie : विराजस कुलकर्णी दिग्दर्शित 'व्हिक्टोरिया' सिनेमा ; पाहा व्हिडीओ

आजच्या शो मध्ये राखीनं (Rakhi Sawant) देखील काही काळ प्रेक्षकांचे मनोरंजन केले. स्पर्धेच्या मध्यात आलेल्या राखीनं नेहमीप्रमाणे आपल्या वादग्रस्त वक्तव्यानं चाहत्यांचे लक्ष वेधून घेतलं होतं. यासगळ्यात तिच्या पतीची रितेशच्या नावाची चर्चा होती. मात्र त्या दोघांनाही बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आजच्या बिग बॉसच्या अंतिम सोहळयामध्ये राखीनं तिच्या पतीसह जबरदस्त सादरीकरण करुन चाहत्यांची वाहवा मिळवली होती. यंदाच्या विजेत्या स्पर्धकाला 50 लाख रुपये आणि ट्रॉफी दिली जाणार आहे. तेजस्वीच्या बाबत सांगायचे झाल्यास तिनं डेलि सोपमधून आपल्या करियरला सुरुवात केली. तर प्रतिक हा मुळचा दिल्लीचा असून त्यानं वेगवेगळ्या रियॅलिटी शो मध्ये काम केलं आहे.

Tejasswi Prakash Is The Winner Of Bigg Boss 15
Bigg Boss 15: 'आधी तुझ्या बॉयफ्रेंडला सांभाळ'; तेजस्वीवर बिपाशा भडकली

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com