Archana Poorn Singh: 'मुलं माझी खिल्ली उडताना पाहतात तेव्हा...' | Archana Puran Singh reaction on kids Kapil Sharma | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

archana puran singh

Archana Poorn Singh: 'मुलं माझी खिल्ली उडताना पाहतात तेव्हा...'

Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध शो म्हणून कपिलच्या कॉमेडी शो ला मिळणारा प्रतिसाद मोठा आहे. त्या कार्यक्रमातून अर्चना पुरन सिंग यांनी नेहमीच चाहत्यांचे लक्ष वेधून घेतले आहे. आता त्यांनी एका मुलाखतीतून (Archana Puran Singh News) मोठी गोष्ट सांगितली आहे. ती गोष्ट कपिल शर्मा शो च्या चाहत्यांना भावली आहे. काही दिवसांपूर्वी अर्चना पुरन सिंग यांची एक बातमी व्हायरल झाली होती. त्यात त्यांनी आपल्या सासूचे निधन झाल्यानंतर (Entertainment News) देखील हसतानाचे काही प्रसंग शुट करुन द्यावे लागले होते. दिग्दर्शक सतत लाफ्टर रिअॅक्शन द्या असे सांगत होता. मात्र माझ्या मनात कालवाकालव सुरु होती.

आता अर्चना पुरन सिंग यांनी वेगळी गोष्ट चाहत्यांना सांगितली आहे. त्यात त्या म्हणतात कपिल शर्मा शो जेव्हा माझी मुलं पाहतात तेव्हा त्यांची प्रतिक्रिया वेगळी (Viral News) असते. त्या कार्यक्रमामध्ये माझी खिल्ली उडवली जाते ते त्यांना पाहवत नाही. त्यावरुन त्यांनी अनेकदा मला बजावले देखील आहे. काही गोष्टी सांगितल्याही आहेत. बऱ्याच वर्षांपासून अर्चना पुरन सिंग या कपिल शर्मा शोमध्ये जज म्हणून भूमिका निभावत आहे. केवळ कपिलच नाही तर बाकीची टीमदेखील त्या मालिकेच्या दरम्यान लाफ्टरसाठी अर्चना पुरन सिंग यांची खिल्ली उडवताना दिसून येतात.

अर्चना पुरन सिंग यांनी म्हटलं आहे की, मुलं आता मोठी झाली आहेत. ते नेहमी हॉलीवूड चित्रपट आणि स्टँड अप कॉमेडी पाहत असतात. त्या कार्यक्रमातून वेगवेगळ्या स्पर्धकांना कसे अपमानित केले जाते ते त्यांना माहिती आहे. त्यांनी लहानपणापासून मला कपिल शर्मा शो मध्ये पाहिलं आहे. कॉमेडी सर्कसमधील माझी भूमिका त्यांना माहिती आहे. त्यामुळे ते आता मला त्यावरुन वेगवेगळे प्रश्न विचारुन सतावतात. त्यांना माझा होणारा अपमान, उडवली जाणारी खिल्ली मान्य नाही. त्यावरुन ते मला सतत सुचना करत असतात.

हेही वाचा: IIFA 2022: सलमानला का आलं रडू? 'त्या' प्रसंगाविषयी सांगताना झाला भावूक

जगभरातील चित्रपट किंवा स्टँड अप कॉमेडी शो पाहिल्यावर त्यांना हे सगळं नॉर्मल वाटत असेल असं मला वाटायचं पण हे काही खरं नाही. त्यांना माझ्याबाबतीत जे होतं त्याचे वाईट वाटते. हे मला सांगायचे आहे. कपिलच्या शो मधून माझ्या पतीवरही जोक क्रिएट केले जातात. त्यांना त्याचे काही वाटत नाही. 30 वर्षांपूर्वी अर्चना यांचे परमीत यांच्याशी लग्न झाले. त्यांना आर्यमान आणि आयुषमान नावाची दोन मुलं आहेत.

हेही वाचा: IIFA 2022: गाढवावर बसून आयफा शो मध्ये दोन बॉलीवूड सेलिब्रेटींची हजेरी

Web Title: Tv Entertainment News Archana Puran Singh Reaction On Kids Kapil Sharma Show Comedy

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top