Roadies 18 Winner: नंदिनी, आशिष भाटियानं मारली बाजी! |Tv Entertainment news roadies 18 winner | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

roadies news

Roadies 18 Winner: नंदिनी, आशिष भाटियानं मारली बाजी!

Roadies 18 Winner: टीव्ही मनोरंजन विश्वात ज्या रियँलिटी शोची नेहमीच चर्चा असते त्या रोडीजचा चाहतावर्ग मोठा आहे. गेल्या काही दिवसांपासून रोडिजचे (Tv entertainment) विजेते कोण होणार अशी चर्चा रंगली होती. अखेर त्याचे विजेते समोर आले आहेत. रोडिज 18 चा ग्रँड फिनाले मोठ्या थाटामाटात पार पडला असून त्यातील विजेत्यांवर चाहत्यांनी कौतूकाचा वर्षाव केला आहे. विजेत्यांना दहा लाख रुपयांचा चेक देण्यात आला आहे. रोडीजच्या यापूर्वीच्या सीझनला (winner viral news) देखील नेटकऱ्यांचा मोठी प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे.

रोडिजचा यंदाचा सीझन मात्र कमालीचा रंगतदार झाला. त्यात सोशल मीडियावरुन नेटकऱ्यांनी घेतलेला सहभाग स्पर्धकांचा उत्साह वाढवणारा होता. (social media entertainment news) रोडीजच्या 18 व्या सीझनमध्ये नंदिनी आणि आशिष भाटिया यांनी विजेतेपद मिळवले आहे. त्यांना ट्रॉफी, दहा लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला आहे.याशिवाय त्यांनी वेगवेगळे गिफ्टही आपल्या नावावर केले आहेत. सरतेशेवटी रोडीजचा विजेता समोर आला आहे. गेल्या काही दिवसांपासून यंदाच्या सीझनचा विजेता कोण होणार याची मोठी उत्सुकता होती. तीन महिने सुरु असणाऱ्या या मालिकेनं प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेतले होते.

हेही वाचा: Video: आपल्याला दोन्ही हातच नसेल तर?...

रोडीझच्या इतिहासात पहिल्यांदाच एक वेगळी गोष्ट घडली आहे. ती म्हणजे यंदाच्या सीझनचे विजेतेपद हे दोन जणांना देण्यात आले आहे. यावेळच्या शोचे होस्टिंग प्रसिद्ध अभिनेता सोनू सुदनं केले होते. यावेळी एका मुलाखतीतून नंदिनी आणि आशिष भाटिया यांनी आपल्या प्रवासाविषयी सांगितले आहे. नंदिनी म्हणाली, माझी आणि आशिषची जोडी एकदम हिट झाली. नेटकऱ्यांना आवडली. त्याचा आम्हाला फायदाही झाला. आशिषनं सुरुवातीपासूनच चांगला परफॉर्मन्स दिला होता.

हेही वाचा: Video: काजलला झाले अश्रु अनावर

Web Title: Tv Entertainment News Roadies 18 Winner Nandini Ashish Bhatia 10 Lakh Prize

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top