
Tv Entertainment news: टीव्ही मनोरंजन विश्वात सध्या ज्या मालिकेची प्रेक्षकांना कमालीची उत्सुकता आहे त्या 'योग योगेश्वर जय शंकर' (Marathi Song Viral) मालिकेचं शीर्षकगीत व्हायरल झालं आहे. त्याला नेटकऱ्यांचा मोठा प्रतिसाद मिळाल्याचे दिसून आले आहे. प्रसिद्ध संगीतकार 'कुणाल - करण'ने संगीतबद्ध केलेले आणि गायिका 'सोनाली सोनावणे' हीने गायलेले मालिकेचे टायटल ट्रॅक व्हायरल, प्रेक्षकांची (Marathi News) पसंती मिळाली आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅक गायिका सोनाली सोनावणे व गायक रविंद्र खोमणे यांनी गायले आहे तर कुणाल करण यांनी हे गाणं लिहिलं असून त्यांनीच संगीतबद्ध केलं आहे.
संगीतकार कुणाल - करण यांनी या मालिकेच्या टायटल ट्रॅक विषयी सांगितलं की, "या आधी आम्ही 'अल्टी पल्टी सुमडीत कल्टी, किचन कल्लाकार, बॅंड बाजा वरात, महामिनिस्टर या मालिकेंचे टायटल ट्रॅक केले आहे. गायक रविंद्र खोमणे यांचा रांगडा आवाज आणि गायिका सोनाली सोनावणे हीचा मधाळ आवााज यांची सांगड या नव्या टायटल ट्रॅकमध्ये तुम्हाला अनुभवता येईल. आम्ही याआधी एकत्र काम केल्याने आमच्यात एक कम्फर्ट झोन आहे. त्यामुळे हसत्या खेळत्या वातावरणात हे टायटल ट्रॅक रेकॉर्ड करताना आम्ही खूप एन्जॉय केलं. या गाण्याविषयी सांगायचं झालं तर या गीताचे शब्द संगितबद्ध करताना त्या सर्व गोष्टी डोळ्यासमोर दिसत होत्या. मनात एक वेगळाच भाव होता. आणि हे प्रत्यक्षात उतरण्यामागेही ईश्वराचे आशीर्वाद आहे. 'योग योगेश्वर जय शंकर' या अध्यात्मिक मालिकेचं टायटल ट्रॅक करण्याची संधी कलर्स मराठीने आम्हाला दिली त्यासाठी आम्ही त्यांचे आभार मानतो."
गायिका सोनाली सोनावणे टायटल ट्रॅकच्या रेकॉर्डींग दरम्यानचा किस्सा शेअर करताना सांगते, "अनेक अल्बमची गाणी मी याआधी गायली आहेत. परंतु ब-याच दिवसांपासून माझी इच्छा होती की एखाद्या मालिकेचं टायटल ट्रॅक मला गायला मिळावं. आणि ती इच्छा योग योगेश्वर शिव शंकर या मालिकेमुळे पूर्ण झाली. त्यासाठी मी कुणाल - करण आणि कलर्स मराठीचे आभार मानते. मी संगीतक्षेत्रात पाऊल ठेवतानाच मला अनेक भावगीतं गायला मिळाली. आणि आता मालिकाविश्वात प्रवास सुरू करताना मला सुंदर असं अध्यात्मिक टायटल ट्रॅक गायला मिळणं. ही माझ्यासाठी भाग्याची गोष्ट आहे. माझ्या सर्वच गाण्यांवर प्रेक्षकांनी खूप प्रेम केलं. असचं प्रेम कायम असू द्या. हीच सदिच्छा!!"
लोकप्रिय मालिकांचे टायटल ट्रॅक आणि ट्रेंडींग गाण्यांना संगीत देणारी मराठमोळी जोडी म्हणजे 'कुणाल भगत' आणि करण सावंत'. त्याच बरोबर संगीत विश्वात आपल्या सुमधूर आवाजाचा ठसा उमटवणारी ट्रेंडींग गायिका म्हणून 'सोनाली सोनावणे' प्रसिद्ध आहे. यांनी नुकतंच 'योग योगेश्वर जय शंकर' या मालिकेचं टायटल ट्रॅक केलं आहे. या मालिकेचं टायटल ट्रॅक गायिका सोनाली सोनावणे व गायक रविंद्र खोमणे यांनी गायले आहे तर कुणाल करण यांनी हे गाणं लिहीले असून संगितबद्ध ही त्यांनीच केले आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.