Medium Spicy Song : सई - ललितचं 'बोलायला बोल का पाहिजे', निशब्द संवाद!

कोरोनानंतर मराठी चित्रपट विश्वानं मोठी झेप घेतली आहे. वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे.
Medium Spicy Marathi Movie song
Medium Spicy Marathi Movie song esakal

Marathi movie: कोरोनानंतर मराठी चित्रपट विश्वानं मोठी झेप घेतली आहे. वेगवेगळ्या विषयांचे चित्रपट प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेताना दिसत आहे. त्यांना प्रेक्षकांचा मोठा प्रतिसादही मिळाला आहे. बॉक्स ऑफिसवर देखील या चित्रपटांनी (Box Office News) मोठं यश प्राप्त केलं आहे. सध्या मराठीतील प्रसिद्ध अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री सई ताम्हणकरच्या मीडियम स्पायसीची मोठ्या प्रमाणावर चर्चा आहे. ही जोडी टीव्ही मनोरंजन क्षेत्रातील प्रसिद्ध मालिका चला हवा (Sai Tamhankar) येऊ द्या मध्ये प्रमोशनसाठी आली होती. यावेळी थुकरटवाडीनं प्रेक्षकांचे आणि या सेलिब्रेटींचे चांगले मनोरंजन केले होते. वेगळी कल्पना, त्यावर आधारित कथानक त्याला तितक्याच दमदार दिग्दर्शनाची साथ असं काहीसं मीडियम स्पाईसीच्या बाबत म्हणता येईल.

लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत "मीडियम स्पाइसी" या चित्रपटातील "बोलायला बोल का पाहिजे..." हे गाणे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. ललित प्रभाकर हा सई (Entertainment News) ताम्हणकरच्या मागे चालत आहे आणि पार्श्वभूमीला सुरु असलेल्या निरुत्तर प्रश्नांच्या या गाण्यातून दोघे एकमेकांशी निःशब्द संवाद साधण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. ललितला बरेच काही विचारायचे आहे आणि सईला खूप काही सांगायचे आहे पण दोघांमधला संवाद मात्र हरवलेला आहे असे दिसते आहे. या प्रसंगात त्यांच्या मनातले प्रश्न गीतकार जितेंद्र जोशी यांनी अत्यंत सुंदर शब्दात मांडले आहेत तर संगीतकार हृषीकेश सौरभ जसराज यांनी दिलेल्या हळुवार चालीच्या या गाण्याला जसराज जोशी याच्या आवाजाने एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवले आहे. डी.ओ.पी. राघव रामादोस आणि राहुल चौहान यांच्या छायांकनातून आपल्याला मनोहारी आणि नयनरम्य मुंबईचे दर्शन या गाण्यात होते.

Medium Spicy Marathi Movie song
Bollywood Top 10 : अमिताभ, शाहरुख, सलमान कोणीच नाही! आहे तरी कोण?

प्रसिद्ध निर्मात्या विधि कासलीवाल यांची निर्मिती आणि ललित प्रभाकर, सई ताम्हणकर, पर्ण पेठे, सागर देशमुख, नेहा जोशी, पुष्कराज चिरपुटकर, स्पृहा जोशी, इप्शिता, ज्येष्ठ अभिनेत्री नीना कुळकर्णी, अरुंधती नाग व अभिनेते रवींद्र मंकणी अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या "मीडियम स्पाइसी" या चित्रपटाच्या माध्यमातून युवा नाटककार मोहित टाकळकर मराठी चित्रपटसृष्टीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण करीत आहेत. लॅन्डमार्क फिल्म्स प्रस्तुत, इरावती कर्णिक लिखित तरुणाईचे भावविश्व दाखवणारा "मीडियम स्पाइसी" येत्या १७ जून रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

Medium Spicy Marathi Movie song
Tollywood Vs Bollywood: 'आमचे चित्रपट प्रेक्षकांना आवडतातच!' कमल हासननं सांगितलं कारण...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com