
Tv Entertainment News: टीव्ही मनोरंजन विश्वातील प्रसिद्ध सेलिब्रेटी तेजस्वी प्रकाश आणि करण कुंद्रा यांच्यातील प्रेमप्रकरण काही लपून राहीलेले नाही. त्यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामध्ये त्यांना आपण (Tejasswi prakash) कुठे आहोत याचा विसर पडला असून त्यांनी चक्क बागेतच (karan kundra) रोमान्स सुरु केल्याचे दिसून आले आहे. ज्यावेळी सोशल मीडीयावर हा रोमान्स व्हिडिओ व्हायरल झाला त्यानंतर नेटकऱ्यांनी त्यांच्यावर टीकेला सुरुवात केली आहे. बागेत रोमान्स करताना तुम्हाला काहीच कसे वाटले (Bigg Boss 15) नाही पासून किमान आपण कुठे आहोत हे पाहावं अशा प्रकारच्या प्रतिक्रिया या जोडप्याला नेटकऱ्यांनी दिल्या आहेत.
बिग बॉसच्या 15 व्या सीझनची विजेती तेजस्वी प्रकाशनं नेटकऱ्यांना (Social media news) आपल्याविरोधात बोलण्याची आयती संधीच दिली आहे. गेल्या काही दिवसांपासुन ती वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत आली आहे. तिचं आणि करण कुंद्राचं प्रेम प्रकरण नेटकऱ्यांपासून लपून राहिलेलं नाही. हे दोघेही सध्या गोव्यात आहेत. त्याठिकाणी तेजस्वीचा जन्मदिन साजरा करण्यासाठी गेले आहेत. नागिनच्या सहाव्या सीझनमध्ये तेजस्वीनं केलेल्या भूमिकेचं प्रेक्षकांनी कौतूक (entertainment news) केलं आहे. करणनं तेजस्वीचा जन्मदिवस गोव्यात साजरा करण्याचा प्लॅन केला खरा. मात्र तो काही कारणामुळे चर्चेत आला.
पापाराझ्झींनी त्या दोघांना एका पार्कमध्ये रोमान्स करताना कॅमेऱ्यात कैद केले. त्या फोटोंची सोशल मीडियावर चर्चा व्हायला लागली. गेल्या काही दिवसांपासून हे दोन्ही सेलिब्रेटी चर्चेत आले आहे. त्यांच्या लवस्टोरीवर यापूर्वी नेटकऱ्यांनी वेगवेगळ्या कमेंट्सही दिल्या आहेत. तेजस्वी आणि करण जेव्हा रोमान्समध्ये मग्न होते तेव्हा काही पापाराझ्झींनी त्यांचे फोटो घेतले. ही गोष्ट जेव्हा त्यांच्या लक्षात आली तेव्हा त्यांना ओशाळल्यासारखे झाले होते.
सोशल मीडियावर सध्या या दोन्ही कपल्सच्या रोमान्सचे फोटो व्हायरल झाले आहेत. त्यात तेजस्वीच्या चाहत्यांनी तिच्यावर भन्नाट कमेंटस केल्या आहेत. काही नेटकऱ्यांनी तिला ट्रोलही केले आहे. आपण कुठे आहोत, काय करतो आहोत याचे भान ठेवायला हवे, सेलिब्रेटी असले म्हणून काय झालं बागेत रोमान्स करायचा? असे प्रश्नही नेटकऱ्यांनी त्या दोघांना विचारला आहे. एव्हाना तेजस्वी आणि करणलाही काय होईल याची कल्पना नसल्यानं त्यांना आता नेटकऱ्यांना काय उत्तर द्यायचे असा प्रश्न पडला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.