मानसी, राधिका, अंजलीबाईंचा फोटो झाला व्हायरल

टीम इ सकाळ
रविवार, 25 जून 2017

मराठी मालिकांचे वेड घराघरांत पसरले आहे. सायंकाळी आठ वाजता एकदा टीव्ही सुरू झाला की पार तो साडेदहा अकरापर्यंत चालू असतो. या मालिकांचा जसा चाहता वर्ग आहे, तशा या मालिकांमुळे कंटाळणारा वर्गही आहेच. ज्या लोकांना या मालिका आवडत नाहीत, त्याची मात्र फार गोची होते. सर्व महिलावर्ग टिव्हीसमोर बसल्याने स्वयंपाकापासून बाकीच्या गोष्टींना उशीर होत जातो. याच आशयाचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून फिरतो आहे. 

मुंबई ; मराठी मालिकांचे वेड घराघरांत पसरले आहे. सायंकाळी आठ वाजता एकदा टीव्ही सुरू झाला की पार तो साडेदहा अकरापर्यंत चालू असतो. या मालिकांचा जसा चाहता वर्ग आहे, तशा या मालिकांमुळे कंटाळणारा वर्गही आहेच. ज्या लोकांना या मालिका आवडत नाहीत, त्याची मात्र फार गोची होते. सर्व महिलावर्ग टिव्हीसमोर बसल्याने स्वयंपाकापासून बाकीच्या गोष्टींना उशीर होत जातो. याच आशयाचा मेसेज गेल्या काही दिवसांपासून फिरतो आहे. 

या मेसेजमध्ये एक फोटो देण्यात आला आहे. यात खुलता कळी खुलेनामधील मानसी, माझ्या नवर्याची बायको या मालिकेतील राधिका आणि तुझ्यात जीव माझा रंगला या मालिकेतील अंजलीबाई यांचा एकत्र फोटो आहे. व त्याखाली या तिघी घरात आल्या अन घरात जेवण वेळेवर मिळेना झालंय अशा आशयाची ही कमेंट आहे. 

या मेसेजच्या निमित्ताने नेहमी वेगवेगळ्या मालिकेत दिसणार्या या नायिका एका फोटोत दिसल्याने हा फोटोही बराच व्हायरल होताना दिसतो आहे. 

Web Title: TV serials marathi esakal news

टॅग्स