टीव्ही मालिकांप्रमाणेच आता 'वेबसीरीज'चे शूटिंगही घरच्या घरी

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 1 July 2020

सोनी मराठी वाहिनीने घरच्या घरी एक मालिकाचे चित्रीकरण केले. आता एका वेबसीरीजचे चित्रीकरणही घरच्या घरी करण्यात आले आहे.

मुंबई : लाॅकडाऊनच्या काळात कुणी घरच्या घरी शाॅर्टफिल्मचे शूटिंग केले, कुणी चित्रपट बनविला तर सोनी मराठी वाहिनीने घरच्या घरी एक मालिकाचे चित्रीकरण केले. आता एका वेबसीरीजचे चित्रीकरणही घरच्या घरी करण्यात आले आहे. डेट गाॅन राॅग- २ असे त्या वेबसीरीजचे नाव आहे. इराॅस नाऊ या ओटीटी प्लॅटफाॅर्मवर ती ७ जुलैपासून पाहायला मिळणार आहे.

नक्की वाचा : यंदा वारी तर नाही पण 'विठूराया'चा गजर घुमणार रुपेरी पडद्यावर

'डेट गॉन राँग' सीझन २ ही लॉकडाऊन दरम्यान प्रेमाच्या शोधात प्रवास करणार्‍या एकट्या व्यक्तींविषयीची एक मजेशीर मालिका आहे. अभिषेक शर्मा आणि भक्ती मणियार यांनी यामध्ये काम केले आहे. करण रावल यांचे दिग्दर्शक आहेत.  ही मालिका मनाला ताजेतवाने करत प्रेक्षकांचे मनोरंजन करणार असून व्हर्च्युअल डेटिंग आणि त्याचे मनोरंजक परिणाम प्रेक्षकांना नक्कीच आवडतील. इरॉस नाऊच्या मतानुसार क्विकी प्रकारातील डेट गॉन राँग २ ही एक खिळवून ठेवणारी कथा आहे. एका भागात लोकप्रिय रॅपर आणि त्याच्या चाहत्यांपैकी एक यांच्यातील मजेदार गंमत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे, तर दुसऱ्या भागात वेगवेगळ्या देशातील दोन व्यक्तींमध्ये भावनिक क्षणांनी सुरू झालेले समीकरणाने घेतलेले आश्चर्यकारक वळण पाहायला मिळेल. लाॅकडाऊनच्या काळात घरच्या घरी चित्रित झालेली ही मालिका आहे.

हे ही वाचा : खाकी वर्दीची तत्परता ! एक ट्विट अन् 'त्या' व्यक्तीच्या मदतीसाठी पोलिस धावून गेले

इरॉस ग्रुपच्या चीफ क्रिएटिव्ह ऑफिसर रिधिमा लुल्ला म्हणाल्या, "मला खात्री आहे की व्हर्च्युअल डेटिंगच्या त्याच्या नवीन अनोख्या स्वरूपाचा शो संपूर्णपणे मनाला भीडणारा असू शकेल आणि सर्व प्रेक्षकांना आकर्षित करेल ".

Like TV series, now the shooting of webseries is also done at home


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Like TV series, now the shooting of webseries is also done at home